घरमुंबईमतदार यादीत नाव कसे समाविष्ट कराल ? कसे वगळाल ?

मतदार यादीत नाव कसे समाविष्ट कराल ? कसे वगळाल ?

Subscribe

 भारतीय निवडणूक आयोगाचा मतदार यादी छाननी कार्यक्रम

भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२१ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा छाननी कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 17 नोव्हेंबर 2020 ते 15 ‍डिसेंबर 2020 या कालावधीत हरकती व दावे स्विकारण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची मतदार म्हणून नोंदणी झाली नाही आणि ज्यांचे वय दि. 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट होणे आवश्यक आहे, त्यांनी फॉर्म 6 भरुन द्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

 

- Advertisement -

असा वापरा ऑनलाईन पर्याय

मृत व स्थलांतरीत मतदार असतील त्यांचा शोध घेण्यात येऊन त्यांची नावे मतदार यादीतून कमी करावयाची आहेत. त्यासाठी फॉर्म 7 भरुन द्यावयाचा आहे. तसेच मतदार यादीत नाव, वय, लिंग या बाबी चुकीच्या नोंदविल्या असतीत त्यामध्ये दुरुस्ती करावयाची आहे. यासाठी फॉर्म 8 भरुन द्यावयाचा आहे. या मोहिमेमध्ये मतदार यादी अचूक व निर्दोष होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. सदरचे फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलचा वापर करता येईल. अधिक माहितीसाठी 1950 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करता येणार आहे. मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन, मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात येत आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -