घरमुंबईटी-शर्ट,जीन्स घातले म्हणून पत्नीवर पतीचा हल्ला

टी-शर्ट,जीन्स घातले म्हणून पत्नीवर पतीचा हल्ला

Subscribe

सुसंस्कृत डोंबिवलीतील धक्कादायक घटना,पत्नीवर रुग्णालयात उपचार सुरू

स्त्री- पुरूष समानतेच्या कितीही गप्पा रंगवल्या जात असल्या तरी सुध्दा आजही समाजात स्त्रीवर अनेक निर्बंध घातले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुशिक्षित व सुंस्कृत समजणार्‍या डोंबिवलीत घडला आहे. पत्नी जीन्स आणि टी शर्ट घालून कामावर जाते या कारणावरून पतीने पत्नीला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला आहे. पत्नीवर मुंबईच्या सायन रूग्णालयात उपचार सुरू असून, पती सुधीर जाधव याला डोंबिवली पोलिसांनी अटक केली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात सुधीर जाधव आणि सुजाता जाधव हे दांम्पत्य राहते. दोघेही पती पत्नी कामाला आहेत. मात्र पत्नी सुजाता कामावर जाताना जिन्स आणि टी-शर्ट घालत असल्याने त्याला सुधीरचा विरोध होता. या गोष्टीवरून त्याने तिला अनेकदा हटकले होते. त्यामुळे दोघांमध्ये याच कारणावरून नेहमी भांडणे होत. सुजाता मंगळवारी रात्री कामावरुन घरी आली.

- Advertisement -

कपड्यांवरुन दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. सुधीर याने तिला मारहाण करीत, रागाच्या भरात पत्नी सुजाताचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पत्नी सुजाता बेशुद्ध पडली. तिचा मृत्यू झाल्याचे समजून सुधीर रामनगर पोलीस ठाण्यात हजर झाला. आजूबाजूच्या शेजार्‍यांनी सुजाताला रुग्णालयात दाखल केले. मात्र पुढे तिला सायन रुग्णालयात नेण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -