ठाण्यात पतीने दुसऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या केली

भांडणातून पतीनेच आपल्या दुसऱ्या पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री ठाण्यात घडली.

Thane
Murder of a servant in Mumbra
हत्या

ठाण्यात एका व्यक्तीने त्याच्या दुसऱ्या पत्नीची घरगुती वादातून गळा दाबून हत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पतीविरोधात श्रीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा शुक्ला असे मृत महिलेचे नाव आहे. पत्नीचे निधन झाल्याने दुसरे लग्न करून संसार करणाऱ्या आरोपी सोमनाथ शुक्ला यानेच दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या नावावर खोली करण्यासाठी विरोध दर्शविला. दरम्यान या भांडणातून पतीनेच आपल्या दुसऱ्या पत्नीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. प्राथमिक शवविच्छेदनाच्या आवाहलात मृत्यूचे कारण गळा आवळल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपी सोमनाथ शुक्ला (६५) याच्या विरोधात श्रीनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

खोली सावत्र मुलाच्या नावावर करण्यावरुन वाद

याप्रकरणी विशाल संपत यादव याने श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून आपला जबाब नोंदविला. मृत शारदा यादव यांचा दुसरा विवाह सोमनाथ शुक्ला यांच्याशी झाला. शारदा हिने आपले नाव शारदा शुक्ला केले. दुसरा विवाह केल्यानंतर शारदा हिने आपल्या सोबत पहिल्या पतीचा मुलगा अमोल याला घेऊन आली होती. शारदा ही वडापावची गाडी लावून व्यवसाय करून उदरनिर्वाह करीत होती. शारदा आणि सोमनाथ यांनी मिळून इंदिरा नगर येथे दोन खोल्या बनविल्या होत्या. या दोन खोल्यांपैकी एक खोली शारदाने तिच्या पहिल्या पतीच्या मुलाच्या नावावर करण्याचा तगादा सुरू केला होता. मात्र दोन्ही खोल्या अशोक शुक्ला याच्या नावावर करण्याचा विचार सोमनाथ यांचा होता. एक खोली सावत्र मुलगा अमोल याच्या नावावर करण्यास सोमनाथ यांचा विरोध होता. या भांडणामुळे सोमनाथने शारदाच्या उपचाराची औषधे बंद केली होती.

गळा दाबून हत्या

शारदा हिला अधून-मधून फिट येत असे. सोमनाथ आणि शारदा एकाच घरात राहत होते. तर सावत्र मुलगा अमोल आणि अशोक या दोघांचा विवाह झाल्याने ते विभक्त राहतात. ८ नोव्हेंबर रोजी खोली नावावर करण्याच्या विषयावर शारदा आणि सोमनाथ यांच्यात भांडण झाले. या भांडणात सोमनाथने शारदाचा गळा आवळून खून केला.

सावत्र मुलाने तक्रार नोंदवली

शारदाला सिव्हिल रुग्णालयात आणण्यात आले. मात्र ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्याच दरम्यान सोमनाथ शुक्ला यांच्या विरोधात शारदा यांच्या पहिल्या पतीचा मुलगा विशाल संपत यादव याने श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानुसार शवविच्छेदनाच्या पहिल्या प्राथमिक आवाहलात शारदाचा मृत्यू गळा आवळून किंवा दाबून झाल्याचे समोर आल्याने श्रीनगर पोलिसांनी सोमनाथ शुक्ला याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा अधिक तपास श्रीनगर पोलीस करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here