घरमुंबईहायड्रॉलिक सिझर लिफ्ट मशीन करणार रेल्वे स्थानकांची देखभाल

हायड्रॉलिक सिझर लिफ्ट मशीन करणार रेल्वे स्थानकांची देखभाल

Subscribe

चर्चगेट स्थानकातील पत्रा पडून एक व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर झोपी गेलेल्या पश्चिम रेल्वे प्रशासनाला जाग आली आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून छताला आणि लावलेल्या होर्डिंगचे नट बोल्ट घट्ट करण्यासाठी आणि देखभालीसाठी अत्याधुनिक हायड्रॉलिक सिझर लिफ्ट मशीनची खरेदी करणार आहे. या तीन मशीन पश्चिम रेल्वेत दाखल झाल्या आहेत. मशीनची किमान 13 लाख 50 हजार रुपये इतकी किंमत असून या मशीन्समुळे रेल्वे स्थानकांवरील देखभालीच्या कामाला जलद गती प्राप्त होईल.

13 जूनला चर्चगेट रेल्वे स्थानकाच्या इमारतीवरील महात्मा गांधींचे चित्र असलेल्या होर्डिंगचे पत्रे कोसळून एका पादचार्‍याचा मृत्यू झाला होता. तर दोघे जखमी होते. या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने त्रिसदस्यीस समितीची नियुक्ती केली होती. तेव्हा या समितीने अनेक सूचना पश्चिम रेल्वेला देण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये रेल्वे स्थानक इमारतीवरील अनेक जाहिराती,पोस्टर, रेल्वे स्थानकांचे लोखंडी छतांची जोडणी वादळी वार्‍यामुळे कमकुवत होतात.

- Advertisement -

हवेमुळे हा भाग कोसळण्याची शक्यता असते. परिणामी, भविष्यातील अशा दुर्घटना टाळण्यासाठी नियमित देखभाल करण्यात यावी अशी सुध्दा शिफारस करण्यात आली होती. या मशिन्स पश्चिम रेल्वेच्या वांद्रे रेल्वे स्थानकावर दाखल झाल्या आहेत. याची प्रत्येकी किंमत 4 लाख 20 हजार रुपये आहे. मशिनच्या माध्यमातून रेल्वे कर्मचारी रेल्वे स्थानकांवर उंचीवर असलेल्या जाहिराती,पोस्टर, रेल्वे स्थानकांचे लोखंडी छत यांची तपासणी करणार आहेत.

रेल्वे स्थानकावर असलेल्या छताच्या देखभालीसाठी अत्याधुनिक हायड्रॉलिक सिझर लिफ्ट मशीनची खरेदी करण्यात आली आहे.या मशिनमुळे रेल्वे स्थानकावरील देखभालीच्या आणि डागडुजीच्या कामाला गती मिळणार आहे. – रविंद्र भाकर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे 

- Advertisement -

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -