शरद पवारांमुळे मी खासदार झालो नाही

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे माझ्या खासदारकी संदर्भात जे काही बोलले ते खोटे आहे, मी त्यांच्यामुळे खासदार झालो नाही, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे खोटे बोलू नये आणि चुकीची माहिती देऊ नये, असे ि आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पवार यांना केले.

Mumbai
Prakash Ambedkar slams Shivsena as two mouth snakes
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर

राष्ट्रवादीचे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे माझ्या खासदारकी संदर्भात जे काही बोलले ते खोटे आहे, मी त्यांच्यामुळे खासदार झालो नाही, त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे खोटे बोलू नये आणि चुकीची माहिती देऊ नये, असे ि आवाहन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पवार यांना केले. तसेच पवार यांच्याशी माझा काहीही संबंध नव्हता, असा खुलासा करत पवार खोटे बोलतात, उलट त्यांनी त्यावेळी राज्यसभेची जागा प्रमोद महाजन यांच्यासाठी का सोडली होती, याची माहिती द्यावी, अशी मागणी केली.

पवार यांनी प्रकाश आंबेडकर हे आपल्या पाठिंब्याने खासदार झाले होते, असा दावा केला होता. त्यावर सोमवारी आंबेडकर यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत खुलासा केला. आमचा काँग्रेससोबत त्यावेळी चार जागांचा समझोता झाला होता. त्यात पवार नव्हते, काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांच्याशी माझ्या खासदारकीच्या जागेबाबत समझोता होता. मात्र त्यावेळी मुंबईत काँग्रेसचे अध्यक्ष मुरली देवरा यांनी शरद पवार आपल्याला भेटायला येणार आहेत असे सांगितले होते. त्यावेळी राजगृहावर पवार आले होते, मात्र त्यामुळे त्यांनी मला खासदारकीसाठी पाठिंबा दिला असे होत नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

1999 च्या निवडणुका झाल्या त्यावेळी शरद पवार यांचे सोनिया गांधी यांच्याशी बिनसले होते, त्यामुळे ते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली. त्याच कालावधीत मी अकोल्यातून लोकसभा लढली, त्यावेळी शरद पवार यांच्या पक्षाने माझ्या विरोधात बापू सुभाष टोपे यांना उमेदवार म्हणून उभे केले होते. त्यांनी लाखांहून अधिक मते घेतली होती. यामुळे मला खासदारकीसाठी पवारांनी मदत केली, पाठिंबा दिला या पवार यांच्या बोलण्यात काहीही तथ्य नाही, असे आंबेडकर म्हणाले. त्यामुळे शरद पवार यांनी माझ्यावर व्यक्तिगत टीका करू नये, त्यापेक्षा त्यांनी त्यावेळी प्रमोद महाजन यांना त्यांच्या जागेवर राज्यसभेचे तिकीट का दिले, याचा खुलासा करावा अशी मागणीही केली.
काँग्रेसने देशात महाआघाडी करताना स्थानिक पक्षांना विचारात घेऊन निवडणुका लढवाव्यात, अशी सूचनाही केली. महाआघाडीत राष्ट्रवादी आली तरी त्यांच्या उमेदवारासोबत उमेदवार उभा करायचा की नाही हे त्यावेळी ठरवू, असे आंबेडकर म्हणाले.

मोदी सरकारने राफेल विमान खरेदी आणि रिलायन्सच्या संदर्भात मेंटेनन्स आणि रेडी टू कॉस यासाठीचा खर्च याची माहिती द्यावी. राफेल वापरण्यासाठी अडचणीचे आहे. त्यामुळे त्याचे मेंटेनन्स आणि इतर सर्व जबाबदारी रिलायन्स घेणार असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसे संसदेत सांगावे, अशी मागणी आंबेडकर यांनी यावेळी केली. राफेल विमानांचे मेंटेनन्स, रेडी टू कंडिशन, स्पेअर पार्टबाबत खरेदीमध्ये स्पष्टता नाही. त्यामळे यात मोठा गोंधळ असल्याचे ते म्हणाले. राफेलची किंमत 512 कोटी होती. मेंटेनन्स धरून तो खर्च 712 कोटींपर्यंत जात होता. आता दरवर्षी रिलायन्स कंपनीला मेंटेनन्ससाठी 1 लाख कोटी मोजावे लागतील. रिलायन्स ही विमाने रेडी टू कंडिशनमध्ये ठेवेल, याची गॅरंटी दिलेली नाही. किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याच किमतीत रशियाकडून एका राफेलच्या बदल्यात 5 विमाने आली असती, असेही आंबेडकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here