घरमुंबईमुख्यमंत्र्यांची अपॉईंटमेंट मिळत नसल्याने आम्ही राज्यपालांना भेटतो-चंद्रकांत पाटील

मुख्यमंत्र्यांची अपॉईंटमेंट मिळत नसल्याने आम्ही राज्यपालांना भेटतो-चंद्रकांत पाटील

Subscribe

विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या एका शिष्टमंडळाने बुधवारी पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली. त्यावर भाजप नेते वारंवार राज्यपालांना का भेटतात, असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अपॉईंटमेंट मिळत नसल्यामुळे आम्ही राज्यपालांना भेटतो, असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडायला तयार नाहीत. मग त्यांना करोना रोखण्याबाबत सल्ले कसे देणार असा सवाल देखील चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंची अपॉईंटमेंट मिळवून द्या, आम्ही त्यांना भेटायला तयार आहोत, असे देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंनी हवं तर खास पीपीई किट घेऊन ते दिवसातून चारवेळा बदलावे. पण मुंबईतील रुग्णालयात फिरावे. उद्धव ठाकरेंनी पुणे, औरंगाबाद, मालेगाव, नागपूर या शहरात जाऊन रुग्णालयातील कर्मचार्‍यांशी चर्चा करावी. यामुळे कर्मचार्‍यांचे मनोबल वाढेल असेही चंद्रककांत पाटील यांनी यावेळी सांगतिले.

दरम्यान, राज्यातील भाजपाचे शिष्टमंडळ वारंवार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली होती. राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप या भाजपाच्या शिष्टमंडळाकडून करण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -