Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मी राजीनामा दिलेला नाही, पण तरूणांना संधी मिळावी - बाळासाहेब थोरात

मी राजीनामा दिलेला नाही, पण तरूणांना संधी मिळावी – बाळासाहेब थोरात

Related Story

- Advertisement -

मी दिल्लीत माझ्या नेहमीच्या विषयांसाठी गेलो होतो. पण मी राजीनामा देत आहे, अशी बातमी मला दिल्लीतच समजली. विधानसभेच्या निवडणुका झाल्या, मंत्रीमंडळाचं गठन झालं, त्यावेळी मी विधीमंडळात कॉंग्रेसचा नेता झालो. त्याचवेळी मी सांगितल होत की, मी प्रदेशाध्यक्ष आहे, विधीमंडळ कॉंग्रेसचा नेता आहे, तसेच महसूल मंत्रालयाची जबाबदारी माझ्याकडे आहे. माझ्याकडे सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, मी सर्व जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीने सांभाळेन असे आश्वासनही मी दिले होते. जर कोणाला वाटल की काही जबाबदाऱ्या या इतरांना द्याव्यात, तर माझी त्यासाठी हरकत नाही. मी सर्व जबाबदाऱ्या एकटाच समर्थपणे सांभाळत आहे. सद्यस्थितीला मी राजीनामा दिलेला नाही, मी प्रदेशाध्यक्ष आहेच. पण तरूणांना जबाबदारी दिली, तर तरूणांच्या पाठीशी मी उभा राहीन असे स्पष्टीकरण कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे.

- Advertisement -

एच के पाटील हे महाराष्ट्राचे प्रभारी झाल्यानंतर त्यांनाही माझ्याकडे असलेल्या अनेक जबाबदाऱ्यांबाबतची वस्तुस्थिती मी सांगितली. पण माझ्याकडून जबाबदाऱ्या काढून घेऊन इतरांना सोपावण्याची चर्चा अचानकपणे सुरू झाली असेल, तर त्याचे मी स्वागत करतो. दिल्लीत माझी या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही, राजीनामा देण्याचा विषयच येत नाही, असे थोरात यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

माझ्याकडे एकाहून अधिक जबाबदाऱ्या आहेत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच ही जबाबदारी विभागून देण्याची साहजिकपणे मागणी होऊ शकते. अनेक जबाबदाऱ्या एकाकडे असतील तर ती वाटून देण्याचे म्हणणे चुकीच नाही. तरूण, धडाडीचा, राज्यभर फिरणारा, पक्षाला पुढे नेणारा नेता या पदावर यावा अशी माझीही अपेक्षा आहे. त्यामुळेच तरूण नेतृत्वाला मी पाठिंबाच देईन असे त्यांनी सांगितले. एच के पाटील यांच्या विरोधात नाराजी आहे का ? या मुद्द्यावरही थोरात म्हणाले की, एच के पाटील हे अत्यंत मनापासून काम करणारे व्यक्तीमत्व आहे. चांगल्या पद्धतीने काम करतात, असे ते म्हणाले.


- Advertisement -

 

 

 

 

- Advertisement -