घरदेश-विदेशमी हिंदुस्तानियत सोडणार नाही

मी हिंदुस्तानियत सोडणार नाही

Subscribe

नयनतारा सहगल यांचा निर्धार

सध्या देशात निष्पाप लोकांना ठार मारण्याबरोबरच त्यांना तुरुंगात टाकण्यात येत आहेे. यातही मुसलमानांना दररोज मारले जात आहे. याबाबत पुढे येऊन कोणीही बोलण्यास तयार नाही. तुम्ही शांत राहिला तर देशासाठी हे घातक असेल. आपण हिंदू नाहीत, पण सर्व हिंदुस्तानी आहोत. त्यामुळे आम्ही ‘हिंदुस्तानियत’ सोडणार नाही, असा निर्धार ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांनी व्यक्त केला. दादरमधील शिवाजी नाट्य मंदिर येथे ‘चला एकत्र येऊ या’ या कार्यक्रमात सहगल यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

देशातील परिस्थितीवर भाष्य करताना त्या पुढे म्हणाल्या, पूर्वी धरती, जीवन, भारत आझाद व्हावा अशी भावना सर्वत्र होती. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. प्रत्येकाला जगण्याचे स्वातंत्र्य हवे आहे. तुम्ही शांत राहिलात तर देशात अराजकता माजेल. देशातील निष्पाप मुसलमानांवर हल्ले होत आहेत. निष्पापांना विनाकारण तुरुंगात टाकले जात आहे. पण, कोणीही पुढे येऊन बोलण्यास तयार नाही. त्यामुळे आपण पुढे येऊन याबाबत बोलले पाहिजे, असे सहगल म्हणाल्या. आज चित्रपटसृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात शांतता आहे. लवकरच निवडणुका येत आहेत, त्यामुळे तुम्ही शांत राहिला तर देशासाठी हे घातक असेल. आपण हिंदू नाहीत. पण, सर्व हिंदुस्तानी आहोत. त्यामुळे आम्ही ‘हिंदुस्तानियत’ सोडणार नाही, असे त्या म्हणाल्या.

- Advertisement -

यवतमाळ येथील अ.भारतीय मराठी साहित्य संमेलनातील भाषणातून मी देशातील सद्यस्थितीवर बोलणार होते. माझे भाषण मी आयोजकांना पाठवले होते. त्यांनी त्याचा अनुवाद केला होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार आहेत, याची मला कल्पना नव्हती. भाजपच्या मुख्यमंत्र्यांना कदाचीत माझे भाषण आवडले नसेल, असे म्हणत सहगल यांनी भाजपवर एकप्रकारे टीकाच केली होती. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचे नयनतारा सहगल यांना पाठवलेले निमंत्रण आयोजकांनी अचानक सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केले होते. त्यानंतर सहगल आणि मराठी साहित्य संमेलनाचा वाद चांगलाच गाजला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -