घरमुंबईतुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, राज्य मानवी हक्क आयोगावर दिली जबाबदारी

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, राज्य मानवी हक्क आयोगावर दिली जबाबदारी

Subscribe

राज्य सरकारमार्फत आज पुन्हा एकदा तुकाराम मुंढे यांची बदलीचे आदेश निघाले आहेत. आता मुंढे यांची पोस्टिंग मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी करण्यात आली आहे. अवघ्या पाचव्या महिन्यातच पुन्हा एकदा झालेली ही बदली आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडे सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव असा पदभार होता. तुकाराम मुंढे यांच्यासोबतच आणखी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या ठाकरे सरकारने केलेल्या आहेत. तुकाराम मुंढे हे १९८५ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. अवघ्या पाच महिन्यातच झालेल्या बदलीमुळे पुन्हा एकदा मुंढे यांच्या बदलीचा मुद्दा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव या पदाची जबाबदारी सांभाळण्याआधी तुकाराम मुंढे यांच्याकडे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी होती.

आणखी तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अरविंद कुमार यांची बदली ही सहकार आणि वस्त्रोद्योग विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून झालेली आहे. अरविंद कुमार हे १९८५ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. डी बी गावडे या २००७ च्या सनदी अधिकाऱ्याची बदली राज्याच्या आरोग्य विभागात झाली आहे. तर १९९९ च्या बॅचचे उदय जाधव यांची बदली नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन, नवी मुंबई याठिकाणी झाली आहे.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -