आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर फोडण्याचा प्रयत्न

मुंबई, बिहार आणि उत्तर प्रदेशातून सहा आरोपींना अटक

Mumbai
अटक

मुंबई सेंट्रल येथील मराठा मंदिर सिनेमागृहाजवळील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटमधील सुरक्षारक्षकांना मारहाण करुन एटीएम सेंटर मशिन गॅस कटरच्या सहाय्याने तोडून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पळून गेलेल्या सहाजणांच्या एका टोळीला नागपाडा पोलिसांनी अटक केली. अर्जुन किशोर चौधरी, मन्नूकुमार मदन प्रसाद, संदीपकुमार राजेंद्र प्रसाद, रवीकुमार लल्लनप्रसाद गुप्ता, अमीतकुमार ओमप्रकाश सिंग आणि रोहितकुमार सुरेंद्र चौधरी अशी या सहाजणांची नावे आहेत. अटकेनंतर या सर्वांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत एक आरोपी फरार असून त्याच्या अटकेसाठी आता पोलिसांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

मुंबई सेंट्रल येथील बाबासाहेब गावडे इंस्टिट्यूट, मराठा मंदिर सिनेमागृहाजवळ आयसीआयसीआय बँकेचे एक एटीएम सेंटर आहे. या ठिकाणी दोनजण सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत आहेत. 27 ऑक्टोबरला रात्री पावणेदोन वाजता तिथे सातजणांची एक टोळी आली होती. या टोळीने एटीएम सेंटरच्या सुरक्षारक्षकांना मारहाण करुन त्यांचे हातपाय आणि तोंड बांधून त्यांना डांबून ठेवले. त्यानंतर एटीएम मशिन गॅस कटरच्या सहाय्याने बँकेतील कॅश चोरीचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा तो प्रयत्न फसला गेला होता. त्यानंतर ते बँकेतील लॅपटॉप, इंस्टा बँकिंग मशीन आणि दोन्ही सुरक्षारक्षकाचे मोबाईल असा एक लाख आठ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पलायन केले होते.

हा प्रकार उघडकीस येताच नागपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच अर्जुन चोधरी याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्याबत घेतले होते. चौकशीत त्याने त्याच्या सहा सहकार्‍यासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यानंतर पहून गेलेल्या इतर चार आरोपींना लखनऊ आणि गोरखपूर येथून, अमीतकुमारला बिहार तर रविकुमारला मुंबईतून पोलिसांनी अटक केली. या सहाही आरोपीकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. एक आरोपी फरार असून त्याचा आता पोलीस शोध घेत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here