आयडॉल प्रवेशाला लवकरच प्रारंभ होणार

२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पदवीस्तरावरील द्वितीय, तृतीय आणि पदव्युत्तर स्तरावरील भाग २ साठी २५ हजार ६९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या प्रवेशाची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२० आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला युजीसी-डीईबीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी मान्यता दिली असून त्यानुसार प्रथम वर्षाचे प्रवेश आयडॉल लवकरच सुरु करणार आहे.

युजीसी-डीईबीने शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी भारतातील ३३ विद्यापीठांना प्रथम वर्षाचे प्रवेश सुरु करण्यास मान्यता दिल्याचे पत्र १२ ऑक्टोबर २०२० रोजी युजीसीच्या संकेतस्थळावर प्रदर्शित झाले. या पत्रानुसार मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेलाही शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश करण्यास मान्यता मिळाली आहे. यानुसार आयडॉल प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएससी आयटी या पदवीस्तरावरील अभ्यासक्रमासाठी तर भाग १ एमए, एमए शिक्षणशास्त्र, एमकॉम, एमएस्सी गणित, एमएस्सी आयटी व एमसीए या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्रवेश लवकरच सुरु केले जाणार आहेत. युजीसी-डीईबीने गतवर्षी आयडॉलच्या १५ अभ्यासक्रमाला मान्यता दिली होती, यानुसार मागील वर्षी जुलैच्या सत्रामध्ये ६७ हजार २३७ तर जानेवारी सत्रामध्ये ९२० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले होते. २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात पदवीस्तरावरील द्वितीय, तृतीय आणि पदव्युत्तर स्तरावरील भाग २ साठी २५ हजार ६९७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या प्रवेशाची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०२० आहे.