आयडॉलच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

आयडॉलच्या २१ पैकी १७ परीक्षा सोमवारी सुरु होत आहेत. अन्य ४ परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने स्थगित केलेल्या अंतिम वर्षाच्या व बॅकलॉग परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या. या परीक्षा १९ ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. या सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. आयडॉलच्या २१ पैकी १७ परीक्षा सोमवारी सुरु होत आहेत. अन्य ४ परीक्षांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत.

अंतिम वर्ष बीएस्सी आयटी सत्र ६, तृतीय वर्ष बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स, एमएस्सी भाग २ गणित, आयटी व कॉम्प्युटर सायन्स व एमए शिक्षणशास्त्र भाग २ या परीक्षा व बॅकलॉगच्या प्रथम व द्वितीय वर्ष बीए व बीकॉम, बीएस्सी आयटी सत्र ४ व ५ आणि एमसीए सत्र १ ते ५ या परीक्षा १९ ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. या सर्व परीक्षांच्या सराव परीक्षा पूर्ण झालेल्या आहेत. तर तृतीय वर्षे बीए व बीकॉम या परीक्षा २६ ऑक्टोबरपासून ऑनलाईन सुरू होत आहे. पदव्युत्तर वर्ष द्वितीय वर्षाच्या एमएची परीक्षा २ नोव्हेंबरपासून तर द्वितीय वर्ष एमकॉमची परीक्षा ६ नोव्हेंबरपासून ऑनलाईन घेण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या सराव परीक्षा लवकरच घेण्यात येणार आहेत.


हेही वाचा : कोरोनामध्ये ८५ हजार बेरोजगारांना रोजगार