आयडॉलच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशास सुरुवात

यावर्षी प्रथमच पदवी प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमएस्सी गणित, आयटी व एमसीए हे अभ्यासक्रम सत्र पद्धतीने सुरु होत आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या (आयडॉल) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशास ९ नोव्हेंबरपपासून सुरुवात झाली. हे ऑनलाईन प्रवेश १८ नोव्हेंबर २०२० पर्यंत सुरु राहतील.

यूजीसीने वर्ष २०२०-२१ साठी १२ ऑक्टोबर रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यादी जाहीर केली. यामध्ये मुंबई विद्यापीठाला प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यास परवानगी मिळाली. यानुसार मुंबई विद्यापीठाने ९ नोव्हेंबरपासून प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु केले आहेत. यापूर्वी द्वितीय व तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्षाचे प्रवेश सुरु झाले होते. यामध्ये आजपर्यंत ३० हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

आयडॉलमध्ये प्रथमच सत्र पद्धत

आयडॉलमध्ये सर्व अभ्यासक्रम वार्षिक पद्धतीचे होते, परंतु आयडॉलमधील अभ्यासक्रम सत्र पद्धतीने चालवावेत असे युजीसीचे निर्देश होते. यानुसार यावर्षी प्रथमच पदवी प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमएस्सी गणित, आयटी व एमसीए हे अभ्यासक्रम सत्र पद्धतीने सुरु होत आहेत. आता महाविद्यालय व आयडॉलचा अभ्यासक्रम एकच असणार आहे. यामुळे जे विद्यार्थी महाविद्यालयातून आयडॉलमध्ये किंवा आयडॉलमधून महाविद्यालयात पुढील वर्गात प्रवेश घेत असतात. त्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच आयडॉलच्या विद्यार्थ्यांनाही या सत्र पद्धतीचा फायदा होणार आहे.