घरमुंबईआयडॉलचे जानेवारी सत्राचे प्रवेश १९ जानेवारीपासून सुरु

आयडॉलचे जानेवारी सत्राचे प्रवेश १९ जानेवारीपासून सुरु

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशास १९ जानेवारी २०२१ पासून सुरुवात होत आहे. हे प्रवेश ३० जानेवारी २०२१ पर्यंत असतील.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या जानेवारी सत्राच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशास १९ जानेवारी २०२१ पासून सुरुवात होत आहे. हे प्रवेश ३० जानेवारी २०२१ पर्यंत असतील. पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या जानेवारी सत्रात बीए किंवा बीकॉमच्या प्रथम वर्षात प्रवेश घेता येईल. या जानेवारी सत्रामध्ये विद्यार्थी बीए, बीकॉम, एमए, एमकॉम व एमए शिक्षणशास्त्र या पाच अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेऊ शकतील. हे सर्व प्रवेश ऑनलाईन आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या https://old.mu.ac.in/distance-open-learning/ या संकेतस्थळावरून प्रवेश घ्यावा.

२०२० मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने जुलै सत्राबरोबरच जानेवारी सत्रातही प्रवेश देण्याची अनुमती दिली. यानुसार वर्ष २०२० मध्ये मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेला जानेवारी सत्राचे प्रवेश करण्यास मान्यता देण्यात आली. २०२० मध्ये ९०० विद्यार्थ्यांनी आयडॉलमध्ये जानेवारी सत्रात प्रवेश घेतला होता. तसेच २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांच्या जुलै सत्रामध्ये ५९ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. जे विद्यार्थी बारावीच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झाले असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना काही कारणामुळे जुलै सत्रात प्रवेश घेता आला नाही त्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची ही एक संधी आहे.

- Advertisement -

आयडॉलमध्ये जुलै सत्रामध्ये सत्र पद्धतीस प्रारंभ झाला आहे. या जानेवारी सत्रामध्ये पदवीच्या प्रथम वर्ष बीए, बीकॉम बरोबरच पदव्युत्तर प्रथम वर्ष एमए व एमकॉममध्येही सेमिस्टर पद्धत सुरु करण्यात येत आहे. एमएमध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी हे भाषा विषय असून मानव्य व सामाजिकशास्त्रामध्ये इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, व समाजशास्त्र हे विषयात प्रवेश घेता येईल. एमकॉममध्येही अकाउंट्स व व्यवस्थापन असे दोन समूह विषय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -