घरमुंबई'२०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाले तर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे'

‘२०१९ च्या निवडणुकीत बहुमत मिळाले तर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे’

Subscribe

लोकसभा निवडणूक अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रत्येक पक्षाकडून प्रचाराचे रणशिंग फुकले गेले आहेत. लोकसभा निवडणूक न लढवता सतत चर्चेमध्ये राहिलेल्या मनसेची या निवडणुकीमध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे. या विषयावर बोलण्यासाठी माय महानगरच्या 'खुल्लम खुल्ला' या फेसबुक लाईव्हमध्ये मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी आपली बाजू मांडली आहे.

‘आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेचे एकच लक्ष्य आहे ते म्हणजे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या हिटलरशाहीला घालवायचे. त्यामुळे राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा जो निर्णय घेतला तो महत्वाचा असल्याचे मत संदीप देशपांडे यांनी मांडले. आपलं महानगरच्या ‘खुल्लम खुल्ला’ या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे

२०१९ मध्ये पक्षाची स्थिती मजबूत असेल. शिवसेना,भाजप यांच्या अंगावर जाणारा विरोध पक्षनेता कोण त्याठिकाणी राज ठाकरे यांचेच नाव येते. २०१९ मध्ये मनसेला बहुमत मिळाले तर राज ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे असे मला वाटते. याचे कारण त्याचे व्हिजन खूप चांगेल आहे. मी नगरसेवक असताना त्यांनी मला खूप गोष्टी सांगितल्या. ऐवढा चांगला व्हिजनरी माणूस मिळाला तर विकास होईल. राज ठाकरें ऐवढा व्हिजनरी माणूस मी अजूनही पाहिला नाही.

- Advertisement -

विधानसभा निवडणूक ताकदीने लढवू

लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी २०१४ साली सांगितला होता. आमचा प्रादेशिक पक्ष आहे. आम्ही लोकसभा निवडणुकीपासून लांब राहु आणि विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढू म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. ही भूमिका २०१४ ला राज ठाकरे यांनी जाहीर केली. राष्ट्रीय पक्ष जे निवडणूक लढवतात त्यांच्यामध्ये निवडणूक होतेय. राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका यासाठी महत्वाची आहे कारण आज देशामध्ये ज्या पध्दतीने हुकुमशाही चालली आहे जे वातावरण आहे ते घालवणे महत्वाचे आहे.

मनसेचे एकच लक्ष्य हिटलरशाहीला देशातून घालवणे

आज पंतप्रधानांचे भाषण ऐकले देशाच्या जवानांच्या नावावर एक वोट करणार की नाही असे मोदी म्हणाले. जवानांच्या नावावर यांना मत मागावे लागत आहे. याचा अर्थ पाच वर्षात यांनी काहीच कामं केले नाही त्यामुळे त्यांना जवानांच्या नावावर मत मागावे लागत आहे. तुम्ही आता ठरवायला लागले आहात की तू देशद्रोही आहे तुम्ही देशभक्त आहे. हे सर्टिफिकेट आम्ही या लोकांकडून घ्यायची. हे सगळं वातावरण बघितलं तर मला असे वाटते की, राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतला तो अतिशय योग्य घेतला आहे. आता जे मनसेचे लक्ष्य आहे ते म्हणजे मादी आणि शहांची हिटलरशाही देशातून घालवणे महत्वाचे आहे.

- Advertisement -

पुढची लोकसभा निवडणूक लढवू

आम्ही लोकसभा निवडणूक लढवली नाही असे नाही. आम्ही २००९ आणि २०१४ ला लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी आम्हाला चांगले मतदान मिळाले होते. आम्हाला असे वाटते की, ही लोकसभा निवडणूक लढवण्यापेक्षा मोदी आणि शहा हे जाणं जास्त महत्वाचे आहे. लोकसभा निवडणूक पुढची लढवता येईल. आज देशात जी परिस्थिती आहे याच्या आधी ही परिस्थिती नव्हती. या परिस्थितीनुसार राजसाहेबांनी हा घेतलेला निर्णय आहे. तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्ही देशद्रोही हा हुकुमशहा घालवणे गरजेचे आहे. जर्मनीमध्ये दुसऱ्या महायुध्दाच्या आधी हिटलरने जी परिस्थिती निर्माण केली होती ती मोदी निर्माण करत आहे.

मुंबई गुजरातला न मिळाल्याचा मोदींना राग

राजसाहेब चांगले जाणकार आहेत. राज ठाकरे यांनी लहानपणापासून बाळासाहेबांचे बोट धरुन त्यांनी राजकारण पाहिले आहेत. त्यामुळे त्यांना सुध्दा राजकारणातले जाणकार म्हटले पाहिजे. त्यांनी ज्याआर्थी निर्णय घेतला आहे तो विचार करुनच घेतला आहे. लोकसभा निवडणूक लढवण्याची उर्जा आजही आमच्यात आहे. आमचे काम आणि राजसाहेबांचे भाषण पाहिले तर विरोधीपक्ष म्हणून आमची उर्जा सर्वात जास्त दिसते. आम्ही सोशल मीडियावर बघतो, कार्यकर्त्यांशी बोलतो त्यावेळी आमच्या कार्यकर्त्यांची उर्जा जास्त असल्याचे दिसते. त्यामागचे कारण असे आहे की, सर्वांना माहिती आहे पुन्हा जर मोदी आणि शहा आले तर ते महाराष्ट्राची आणि देशाची पुन्हा वाट लावणार आहे. आम्हाला हे शंभर टक्के माहिती आहे की, मुंबई गुजरातला मिळाली नसल्याचा राग नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या मनात आहे. हे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत. त्यांना धडा शिकवण्याचे काम मनसेने आधी केले आहे आणि करत राहणार आहे.

मोदी पंतप्रधान असल्याचं सांगायला लाज वाटते

आपण भाजपच्या चक्रव्यूवात अडकत चाललो आहे. मोदी नाही तर कोण हा चक्रव्यूव भाजपनेच तयार केला आहे. भारतात संसदिय लोकशाही प्रणाली आहे. आपण पंतप्रधान बघून मतदान करतो असे नाही. आपल्याला सर्वोत्तम खासदार निवडणून द्यायचा आहे. आपण जो खासदार निवडून देईल तो सर्वोत्तम देशाचा पंतप्रधान निवडून देईल. मोदी नाही तर कोण, मोदींना पर्याय नाही असे बोलणे चूक आहे. मोदींनी ५ वर्षात काय केले. त्यांनी दोन कोटी रोजगार दिले नाहीत, नोटाबंदी सारखा विचार न करता भावनेच्या भरात घेतलेला निर्णय असा पंतप्रधान आपल्याला पाहिजे का? मोदी पंतप्रधान आहेत हे सांगायला मला लाज वाटते. जो माणूस ‘पहिला वोट एअर स्ट्राईकच्या नावे देणार का असा म्हणणारा पंतप्रधान पाहिजे का? मोदींना पर्याय नाही असे नाहीये. आपल्या वाचून काही अडत नाही जग हे चालत जाते. मोदी नसल्याने देश थांबणार नाही. मोदी नव्हते तेव्हा ही देश थांबलेला नव्हते. आपल्याकडे खूप पर्याय आहे. आपली बघण्याची मानसिकता पाहिजे.

नरेंद्र मोदींपेक्षा राहुल गांधी बरे

राहुल गांधींविषयी माझे मत २०१४ पर्यंत वाईट होते. मात्र मी डोळे उघडे ठेवून आता त्याची भाषण बघतो, त्यांचे व्यवहार बघतो, त्यांचे बोलणे बघतो तर मला मोदीपेक्षा राहुल गांधी जास्त बरे वाटतात. भाजपवाल्यांना वाटत असेल की राहुल गांधी पप्पू आहे तर तो त्यांचा दोष आहे. मला वाटत नाही कारण हे माझे म्हणणे आहे आणि लोकशाहीत मला माझे म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. काँग्रेस हा पाकिस्तानचा पक्ष नाही तर भारतातलाच पक्ष आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासूचाच पक्ष आहे.

भाजपचे नेते कल्पनेच्या विश्वात रमणारे

पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये मॅच्युअॅरिटी अजिबात नाही. कारण त्यांच्यामध्ये जर मॅच्युअॅरिटी असली असती तर त्यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला नसता. तसंच त्यांच्यात शार्पनेस देखील अजिबात नाही. भाजपमधील लोकं कल्पनेच्या विश्वात रमलेली लोकं आहेत. खरी परिस्थिती काय आहे जमिनीवर याचे त्यांना घेणे नाही आणि देणे सुध्दा नाही.

काँग्रेससोबत वैचारिक आघाडी आता नाही

आमचे काँग्रेसबरोबर वैचारिक मतभेद आहेत. पण आज आपल्यासोबत असणारा शत्रू हा देशाला धोका निर्णाण करणारा, लोकशाहीला धोका निर्माण करणारा शत्रू आहे. हा येणाऱ्या पुढच्या तरुण पिढीला नष्ट करणारा शत्रू आहे. त्यामुळे पहिले त्या शत्रूचा नायनाट करुया. बाकी वैचारिक द्वंद आम्ही करत राहू. आमची वैचारीक आघाडी आता तरी नाहीये.

राजकारणात प्रसंगानुरुप निर्णय घेतला जातो

आमचे आताचे उदिष्ट एकच आहे मोदी आणि शहांना सत्तेतून घालवणे हा आहे. पुढची विधानसभा आणि महापालिका निवडणुकीला वेळ आहे. राजकारणात ऐवढ्या लवकर निर्णय घेतले जात नाही तर प्रसंगानुरुप निर्णय घेतले जातात. १९८० साली बाळासाहेबांनी काँग्रेसला साथ दिली. कारण त्यावेळी भाजप आता आहे तसा असेल त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतला होता. काँग्रेसला साथ देण्याचा निर्णय त्यांनी प्रसंगानुरुप घेतलेला निर्णय होता. आज आम्ही जो निर्णय घेतला आहे. तो निर्णय आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरुन निर्णय घेतला आहे.

मनसेचा विचारधारा रुजवायला वेळ लागणार

मनसेची स्वत:ची एक विचारधारा आहे. कुठलीही विचारधारा लोकांमध्ये रुजवायला, लोंकाना ती विचारधारा आपलीशी वाटायला थोडा वेळ द्यावा लागतो. भाजप, काँग्रेस, आरएसएसला त्यांची विचारधारा रुजवायला त्यांना ५० ते ८० वर्ष गेली. आम्ही जी विचारधारा घेऊन आला आहे ती विचारधारा आधी लोकांना पटणार नाही. मात्र सुरुवातीच्या ५ वर्षात काही लोकांना पटेल त्यानंतर २० वर्षानंतर हजार लोकांना पटेल, २५ वर्षामध्ये लाखो लोकांना पटेल. कुठल्याही पक्षाला त्यांची विचारधारा लोकांमध्ये रुजवायला वेळ द्यावा लागतो. आमची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम आमचे सुरु आहे. आमची विचारधारा रुजवण्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा लोकांकडे जाऊ. कोणतिही समस्या घेऊन सर्व जण राज ठाकरेंकडे येतात. जर आम्ही लोकांना आवडत नसू तर ते आमच्याकडे आले नसते. आम्ही चूकलो असेल तर सुधारण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आमच्या आयुष्यातली तिसरी निवडणूक आहे. आमची विचारधारा लोकांना पटली आहे. पुन्हा ती विचारधारा घेऊन आम्ही लोकांकडे जात आहोता. त्यामुळे २०१९ मध्ये आम्हाला चांगले यश मिळवून देतील.

फेसबुकवर लाईक मिळवून फायदा नाही

मुख्यमंत्र्यांच्या फेसबुक पेजला ९२ लाख लाईक आणि राज ठाकरे यांच्या पेजला ९ लाख लाईक असतील. लाईक कसे मिळवायचे हे तंत्रज्ञान आम्हाला माहिती आहे. हा आमच्यात आणि भाजपमधील फरक आहे. आम्हाला तंत्रज्ञान वापरायचे आहे ते लोकांच्या भल्यासाठी वापरायचे आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग का असतो हे शिवाजीपार्कच्या सभेतून आम्ही दाखवून दिले. नुसते लाईक वाढवून लोकं तुम्हाला मनातून लाईक करणार नसेल तर फेसबुकच्या लाईक्सचे करायचे काय. लोकांमध्ये मुख्यमंत्र्यांपेक्षा सर्वात जास्त लाईक्स राज ठाकरेंना केले जात.

खळखट्याक करायची आम्हाला हौस नाही

‘खळखट्याक’ बद्दल सांगायचे झाले तर एखादा व्यक्ती आमच्याकडे समस्या घेऊन आला तर बोलून प्रश्न सूटत नसेल तर वाकड्या पध्दतीने समजावे लागते. लोकांचे कसे आहे की, त्यांच्यापर्यंत असते तेव्हा त्यांना खळखट्याक आवडते. मात्र दुसऱ्यांबाबत असेल तर ते आवडत नाही. ज्याच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशनकडे पाहिले नसेल. आज आमच्यावर १७ – १८ केसेस आहेत. आम्हाला काही हौस नाही. आमच्या घरी आम्हाला ओरडा मिळतो. आम्हाला पासपोर्ट मिळत नाही. लोकांची कामं व्हावी यासाठी घेतलेली ही एक भूमिका आहे. लोकांच्या न्यायासाठी घेतलेली ही भूमिका आहे. ज्यांच्या आयुष्यात जे प्रसंग आले नाही त्यांना ते चूक वाटत असेल. मात्र शंभर टक्के लोकांना खूश करणे मोदींना देखील शक्य झाले नाही.

कायदा हातात घेतला तर फळं सुध्दा भोगावी लागणार

२००८ त्यावेळी आमच्या आंदोलनाचा पीक पिरिअड होता. मला सुध्दा अनेक नोटीस आल्या आहेत. अनेकदा एसीपीसमोर सुनावणी होते. मला सुध्दा तडीपारिची नोटीस आली आहे. तडीपारी लागली तर ती कोर्टातूनच रद्द करावी लागते. त्यासाठी नितीन नांदगावकर स्वत: सक्षम आहेत. सरकारी प्रक्रिया आहे. रोज तुम्ही आंदोलन करत असाल तर सरकार कारवाई करणार. आपल्याकडे कायदा आहे तर कायदा कायद्याचे काम करणार. मी कायदा हातात घेतो तर मला त्याची फळं सुध्दा भोगावी लागणारचं. आम्ही सुध्दा कायदा हातात घेतला तेव्हा आम्ही जेलमध्ये जाऊन बसलो होतो. मी सुध्दा आर्थर रोड जेलमध्ये ८ दिवस होतो.

राज ठाकरे मोदींना घाबरत नाहीत

मास्टर स्ट्रोकचा विषय नाही. ही भूमीका देश हित आणि महाराष्ट्र हिताची आहे. आज ज्या पध्दतीने देशात हुकुमशाहीचा वावर होत चालला आहे. मला भिती वाटते की, देशात २०१९ ला मोदींचे सरकार आले तर २०१९ नंतर २०२४ ची निवडणूक होणार की नाही याची मला काळाची वाटत आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाही तर तमाम लोकांना राज ठाकरे यांच्या भाषणाची उत्सुकता आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे सर्व जण ईडीची लोकांना भीती दाखवतात. या सगळ्या भितीला न जुमानता त्यांच्या अंगावर जाणारा, थेट उत्तर देणारा एकमेव जो नेता असेल तो म्हणजे राज ठाकरे हे आहेत. आज देशात मोदींना भलेभले घाबरले त्यांना प्रश्न विचारणारा कोणच नाही आहे. एकच व्यक्ती आहे ती म्हणजे राज ठाकरे.

सांगळे, दरेकर पक्षामुळे मोठे झाले

राजकारणात पेशन्स खूप कमी राहिले आहेत. आज शाखाअध्यक्ष झाला तर उद्या लगेच नगरसेवक बनायचा आहे अशी कार्यकर्त्यांची विचारधारा झाली आहे. नेते गेले शक्ती गेली अशा काहीच गोष्टी घडल्या नाही. मंगेश सांगळे, प्रविण दरेकरांकडे शक्ती नव्हती. त्यांना शक्ती आम्ही दिली. ती ताकद कार्यकर्त्यांची होती. सर्व मेहनत राज साहेबांची होती. त्या जिवावर हे सर्व जण मोठे झाले. राम कदमला राजसाहेबांनी आमदार बनवले. तिथल्या कार्यकर्त्यांनी मोठं केलं. मात्र कितीही मोठे केले तरी त्यांची ओरिजनालिटी शेवटी कळते.

राज ठाकरेंसारखे कोणीही बोलू शकत नाही

राज ठाकरे ज्या पध्दतीने बोलतात त्या पध्दतीने देशातील एकही नेता बोलू शकत नाही. जी राज ठाकरे यांची बोलण्याची स्टाईल आहे, त्याचा विचार आहे, बोलण्याची पध्दत, ज्या पध्दतीने पुरावे दिले आहेत ते देशातील माणसाने दिले नाहीत. आम्हालो कोण स्क्रिप्ट लिहून देणार उलट आम्ही जे बोलतोय ते स्क्रिप्ट आता सर्वजण चालवत आहेत. राजसाहेबांना शिव्या देणारा मार नक्की खाणार असल्याचे त्यांनी सांगितेल.

भाजप फसवे असल्याचे मला वाटते

मी भारतीय विद्यार्थी सेनेचे काम करायचो. जेव्हा मी रुपारेल कॉलेजला होतो. आमचे सुरेज गुजर होते ते भारतीय विद्यार्थी सेनेचे काम बघायचे. त्यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सुध्दा काम करायची. ते आम्हाला नेहमी सांगायचे की, एबीव्हीपीवर विश्वास ठेवू नको. त्यामुळे भाजपची एक प्रतिमा माझ्या डोक्यात बसली आहे की भाजपवाले फसवतात. ती कशी डोक्यात बसली हे मला माहिती नाही.

लोकांना बदल हवा असतो

राज ठाकरेसाहेब एक गोष्ट नेहमी सांगतात की, जेव्हा तुम्ही सत्ते बसता त्यावेळी तुमचे सत्तेतून बाहेर जाण्याचे दिवस सुरु होता. जेव्हा तुम्ही चांगले काम करता त्यावेळी तुम्ही सत्तेतून उशीरा बाहेर जाता. काम केले नाही तर सत्तेतून लवकर बाहेर जाता. सत्ता ही कोणालाही पर्मनंट मिळालेली नाही. जगातला कुठलाही देश बघा कोणाचीही सत्ता कायम राहिलेली नाही. २०, २५, ३० वर्षानंतर लोकांना बदल हवा असतो.

निष्कर्ष काढायला घाई करतात

एक निवडणुकीला लोकांनी मत दिले नाही तर आमचा फॅन फॉलोविंग कमी झाला असे नाही. आमचे १३ आमदार निवडणून आले होते हे विसरु नका. तुम्ही एकाच निष्कर्षावर फायनल निष्कर्ष काढतो. निष्कर्ष काढायला घाई करता. कुठल्याही गोष्टीचा निष्कर्ष काढताना त्याचा पूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. राज ठाकरे यांना लोकांनी नाकारले अशी न्यूज लाईन घेऊन ब्रेकींग केली जाते. हे करताना आपण खोलात जाऊन त्या गोष्टीचा विचार करतो काय आपण कशावरुन निष्कर्ष काढतो याचा विचार करावा.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -