घरमुंबईआठ दिवसात पाणीप्रश्न न सोडविल्यास हंडा मोर्चा

आठ दिवसात पाणीप्रश्न न सोडविल्यास हंडा मोर्चा

Subscribe

भिवंडी शहर महानगरपालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पाणीप्रश्न सुटू न शकल्याने भाजप नगरसेविकेला आत्महत्या करण्याचा इशारा देण्यापर्यंत वेळ ओढवली आहे. ही घटना लांच्छनास्पद असून, पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने येत्या आठ दिवसांत नारपोली, साठेनगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास भाजपच्या वतीने पालिका कार्यालयावर भव्य हंडा, कळशी मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपच्या शहर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष ममता परमाणी यांनी पालिका प्रशासनाला लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

शहरातील नारपोली, साठेनगर या परिसरात राहणार्‍या नागरिकांना पुरेसे मुबलक पाणी मिळत नसल्याने स्थानिक नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे गेल्या दोन महिन्यांपासून तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी दुलर्क्ष केल्यामुळे त्यांनी 4 फेब्रुवारी रोजी लेखी पत्राद्वारे आत्महत्येचा इशारा दिला.

- Advertisement -

तरीही पाणीपुरवठा विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या नगरसेविका साखराबाई बगाडे यांनी सोमवारी सायंकाळी महासभेत हा विषय मांडत पालिका प्रशासनाचा निषेध करीत पालिकेच्या सातव्या मजल्यावर धाव घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकारामुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्या आजारी पडल्या असून, त्यांच्यावर स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -