आम्ही ठरवले, तर शिवसेनेचच सरकार येईल

शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा विश्वास

Mumbai
sanjay raut
शिवसेनेचे खासदार संजय राऊत

मुख्यमंत्री आपलं सरकार येणार सांगत असतील तर मी त्यांना शुभेच्छा देतो. आपल्याकडे लोकशाही आहे. ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त आहे त्यांना सत्ता स्थापनेचा अधिकार असतो. पण जर शिवसेनेने ठरवले, तर शिवसेनेचेच सरकार आणि शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपला म्हणून राज्यपालांना राजीनामा देण्यासाठी रवाना झाले असताना दुसरीकडे संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्वर ओक येथे रवाना झाले होते. त्याठिकाणी संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केल्यानंतर लागलीच त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली.

शरद पवार यांच्यासोबत बसूनच आपण टिव्हीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर घेतलेली पत्रकार परिषद संपूर्ण पाहिली. मुख्यमंत्र्यांचा शब्द न शब्द ऐकला असून त्यावर शिवसेनेचीही भूमिका स्पष्ट आहे. महाराष्ट्रात सध्या नैसर्गिक आपत्ती आहे. अवकाळी पावसाने राज्यातील शेतीचे आतोनात नुकसान केेले आहे. अशा वेळी राज्यात काळजीवाहू सरकार आहे याचीच काळजी आहे, असा टोलाही यावेळी संजय राऊत यांनी लगावला.

अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर चर्चा झालेलीच
शिवसेनेकडून वैयक्तिक पातळीवर कोणतीही टीका झालेली नाही. मुख्यमंत्र्यांचे हे अत्यंत चुकीचे वक्तव्य आहे. आम्ही नेहमीच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचा आदर केला आहे. उलट ज्या पक्षांनी भाजपवर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली, ज्यांनी भाजपचे वाभाडे काढले, आज भाजप त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून सत्तेत बसला आहे. असे बोलत संजय राऊत यांनीरियाणातील सरकारकडे अंगुलीदर्शन केले. तसेच भाजपसोबत आमची विधानसभा निवडणुकीआधी अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाली होती, याचा पुनरुच्चार केला. कारण मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या पत्रकार परिषद भाजप-शिवसेना यांच्यात अडीच अडीच वर्षांकरता मुख्यमंत्रीपदावर चर्चा झालीच नव्हती, असे वक्तव्य केले होते. त्याच्या राऊत यांनी तात्काळ खुलासा करत मुख्यमंत्र्यांना अप्रत्यक्षपणे खोटे ठरवले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here