घरमुंबईमोबाईलवर तिकिट काढा आणि सवलत मिळवा

मोबाईलवर तिकिट काढा आणि सवलत मिळवा

Subscribe

रेल्वे स्थानकावर कायमच गर्दी असते. तिकीटासाठी असलेल्या रांगेमुळे अनेकवेळा ट्रेन चुकतात आणि एखाद्या ठिकाणी जायला उशीर होतो. आता मोबाईलवर तिकीट काढल्यावर ग्राहकांना विशेष सवलत मिळणार आहे. रेल्वेने प्रवाशांना मोबाईलवर तिकिट काढण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. जेणेकरुन रेल्वेस्थानकांवर तिकीटासाठी असलेल्या लांबच लांब रांगा कमी होऊ शकतात. प्रवाशांनी रेल्वेच्या ‘क्रिस’ (CRIS) या मोबाईल अॅपचा वापर करत तिकीट काढल्यास त्यांना ५ टक्के सवलत मिळणार आहे. जास्तीतजास्त प्रवाशांनी रेल्वे मोबाईल अॅपद्वारे तिकीट काढावेत यासाठी रेल्वेने सवलत दिली आहे.

मोबाईल अॅपद्वारे तिकीट काढल्याने रेल्वे तिकीट खिडकीवरच्या लांबच लांब रांगा कमी होण्यास मदत होईल. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मोबाईल अॅपद्वारे एक हजार रुपयापर्यंतचा पास काढल्यास त्यावर ५० रुपयांची विशेष सवलत मिळणार आहे. मोबाईल तिकीट अॅपची सुरुवात डिसेंबर २०१४ मध्ये करण्यात आली होती. पण त्याला लोकांचा तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. मध्य रेल्वे दररोज सरासरी सुमारे १० लाख तिकिटे विकते, ज्यापैकी फक्त १३,००० मोबाईल तिकीट असतात; पश्चिम रेल्वे दररोज ९ लाख तिकिटे विकते, ज्यापैकी फक्त ७,५०० मोबाइल तिकीट असतात. याआधी जेव्हा स्वयंचलित तिकिट विक्री मशीन (एटीव्हीम) लावण्यात आले, तेव्हा रेल्वेने त्यावर सुध्दा ५ टक्के सूट देऊ केली होती. नंतर, ही सूट ३ टक्के करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -