दररोज किती कॅलरी बर्न झाली हे समजून घ्यायचंय तर ‘इथे’ नक्की भेट द्या

मुंबई सेंट्रल स्थानकावरील १ आणि २ या प्लॅटफॉर्मवर असलेल्या पादचारी पूलाच्या पायऱ्यांवर कॅलरी बाबतचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. यावरुन तुम्हाला किती कॅलरी बर्न झाल्या हे कळू शकते.

Mumbai
mumbai central railway station
मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन

दररोज ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी. लवकर ट्रेन पकडून कामावर पोहचायच्या नादात आपलं शरीराला फिट राहावं याकडे सर्वांचंच दुर्लक्ष होतं. त्यात ट्रेन पकडायची म्हटल्यावर जिने चढा, अनेक प्लॅटफॉर्म्स बदला अशा अनेक गोष्टी कराव्या लागतात. पण, आता जिना चढण्याचा ही फायदा होऊ शकतो. तुम्ही दिवसभर किती चाललात? त्या चालण्यामुळे तुमची किती कॅलरी बर्न झाली याची माहिती तुम्हाला आता स्टेशनवर उपलब्ध होणार आहे. पण, प्लॅटफॉर्मवरील जिने चढून किती कॅलरी बर्न झाल्या? हे कसं समजणार असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

३.० हून अधिक कॅलरीज बर्न करा

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकावरील १ आणि २ या प्लॅटफॉर्मवर असलेल्या पादचारी पूलाच्या पायऱ्यांवर कॅलरी बाबतचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. या स्टिकरवरून एक पायरी चढल्यानंतर तुम्ही किती कॅलरी बर्न केली हे तुम्हाला कळणार आहे. यामध्ये एक पायरी चढल्यानंतर तुम्ही ०.१ कॅलरी बर्न कराल तर अजून एक पायरी चढल्यानंतर ०.२ इतकी कॅलरी बर्न कराल. त्यामुळे जर तुम्ही प्लॅटफॉर्मवरील जिना चढलात तर ३.० हून अधिक कॅलरीज बर्न करू शकता. रेल्वे प्रवाशांना त्यांच्या आरोग्याबाबत जागृत करण्यासाठी पश्चिम रेल्वेने एक आगळीवेगळी संकल्पना आणली आहे.

पश्चिम रेल्वेच्या या उपक्रमाबाबत माहिती देताना मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र धिवार यांनी सांगितलं की , “पश्चिम रेल्वेने जिन्यांवर आकर्षक असे स्टिकर्स लावले आहेत. यामध्ये एक जीना चढल्यानंतर किती कॅलरी बर्न होतात. याची माहिती देण्यात आली. लोकांच्या आरोग्यासाठी जीने चढणं नक्कीच चांगलं आहे. याच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती देखील होण्यास मदत होईल.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here