‘त्या’ पूलाच ऑडिट करण्यात IIT मुंबई, पालिका, रेल्वेचा निष्काळजीपणाच नडला

एल्फिस्टन पूलावरील चेंगराचेंगरी आणि अंधेरी गोखले पूर कोसळल्याच्या दुर्घटना झाल्यानंतर मुंबई महापालिका, आयआयटी मुंबई आणि रेल्वे प्रशासनाने एकूण ४४५ फुटओव्हर ब्रीज आणि रोड ओव्ह ब्रीज यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. मात्र ऑडिट विभागाकडून या पुलाच्या ऑडिटमध्ये निष्काळजीपणा केल्याचे आता समोर येत आहे.

Mumbai
CSMT
सीएसएमटी पूल

एल्फिस्टन पूलावरील चेंगराचेंगरी आणि अंधेरी गोखले पूर कोसळल्याच्या दुर्घटना झाल्यानंतर मुंबई महापालिका, आयआयटी मुंबई आणि रेल्वे प्रशासनाने एकूण ४४५ फुटओव्हर ब्रीज आणि रोड ओव्ह ब्रीज यांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. ज्यामध्ये कित्येक पुलांची पुर्नबांधणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. तर काही पुलांना डागडुजी करण्याची गरज असल्याचेही सांगण्यात आले होते. दरम्यान, काल सीएसएमटी येथील पादचारी पूल पडल्याने ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून ३६ जण जखमी झाले आहेत. या पुलाचेही ऑडिट करण्यात आले होते. मात्र ऑडिट विभागाकडून या पुलाच्या ऑडिटमध्ये निष्काळजीपणा केल्याचे आता समोर येत आहे. १९८४ साली बांधण्यात आलेला हा पूल पडल्याने मुंबईत आणखी एक मोठी दुर्घटना घडली आहे.

२०० वर्ष जुने पूल मोडकळीस 

आयरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई उपनगरातील रेल्वे रुळावरून एकूण किती पूल जातात, त्यांची बांधणी कधी झाली. त्याची पाहणी करण्यासाठी एकूण किती निरिक्षण आहेत. तसेच त्या निरीक्षकांकडे किती पूलाच्या निरीक्षणाची जबाबदारी आहे. यासंबंधीची माहिती त्यांनी मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी एस. के. श्रीवास्तव यांच्याकडून घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार कर्जत ते कसारा दरम्यान एकूण ७१ फुटओव्हर ब्रीज असून पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते सूरत दरम्यान १६३ फुटओव्हर ब्रीज असून एकूण १४६ पूल आहेत. मात्र जादाचे पूल निरीक्षक नाहीत. कित्येक पूल तब्बल २०० वर्ष जुने असून मोडकळीस आले आहेत.

ऑडिट विभागाने या पूलांच्या दुरूस्ती, पुर्नबांधणीच्या सूचना देण्यात आल्या

 1. येलो गेट फुटओव्हर ब्रीज, मस्जिद पूर्व
 2. एम. के. रोड चंदनवाडी फुटओव्हर ब्रीज, मरीन लाईन्स
 3. हंसा भुगरा मार्ग पाईप पूल
 4. एस. बी आय. कॉलनी पूल
 5. गांधीनगर कुरार गाव पूल, मालाड
 6. वालभात नाला पूल, गोरेगाव
 7. रामनगर चौक पूल, दहिसर
 8. विठ्ठल मंदिर पूल, दहिसर
 9. एस. व्ही. पी. रोड पूल, दहिसर
 10. अकुर्ली रोड पूल, दहिसर
 11. हरी मस्जिद पूल, साकीनाका
 12. तिळक नगर फुटओव्हर ब्रीज
 13. बर्वे नगर फुटओव्हर ब्रीज, घाटकोपर

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here