घरमुंबईदेशात आयआयटी मुंबई अव्वल

देशात आयआयटी मुंबई अव्वल

Subscribe

- रोजगारक्षम शिक्षण देणार्‍या संस्थांची यादी जाहीर

देशात उत्तीर्ण होणारे पदवीधर हे रोजगारक्षम नसतात अशी ओरड सातत्याने होत आहे. याला आता क्यूएस रँकिंगच्या ताज्या अहवालामुळे बळही मिळाले आहे. या यादीत पहिल्या दोनशेमध्ये देशातील अवघ्या चारच संस्थांचा समावेश आहे. यात आयआयटी मुंबई अव्वल असून या संस्थेचा क्रमांक १११ ते १२० या गटात आला आहे.

जगभरातील शैक्षणिक संस्थांना क्रमवारी देणार्‍या ‘क्यूएस रँकिंगने’ नुकतीच रोजगारक्षम शिक्षण देणार्‍या शिक्षण संस्थांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या १००मध्ये देशातील एकही संस्था नसून ११० ते २०० या गटात आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रस आणि आयआयटी दिल्ली या संस्थांचा समावेश आहे. तर मुंबई विद्याापीठ देशात सातव्या तर जागतिक क्रमवारीत २५१ ते ३०० दरम्यान आहे.

- Advertisement -

क्यूएस या संस्थेकडून विविध निकषांवर आधारित विद्याापीठांची क्रमवारी जाहीर करण्यात येते. विद्यापीठातील शिक्षणानंतर विद्यार्थ्यांना मिळालेल्या रोजगाराच्या संधी, त्यांना मिळणारे उत्पन्न, नोकरी किंवा व्यवसायाची संधी मिळणार्‍या एकूण विद्यार्थ्यांची संख्या याआधारे ही क्रमवारी जाहीर करण्यात येते. या क्रमवारीनुसार देशातील दहा विद्याापीठे पाचशे विद्याापीठांच्या यादीत आहेत. कंपन्यांकडून सर्वाधिक प्रतिसाद आयआयटी मुंबईला मिळत असल्याचे या पाहणीत दिसून आले आहे. यासाठी आयआयटी मुंबईला ७१.२ टक्के गुण मिळाले आहेत.

भारतातील शिक्षण संस्था
आयआयटी मुंबई (१११ ते १२०), आयआयटी दिल्ली (१५१ ते १६०), आयआयटी मद्रास (१७१ ते १८०), दिल्ली विद्याापीठ (१९१ ते २००), आयआयटी खरगपूर (२०१ ते २५०), बिट्स पिलानी, मुंबई विद्याापीठ (२५१ ते ३००), आयआयएससी, आयआयटी कानपूर, कोलकता विद्याापीठ (३०१ ते ५००)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -