घरमुंबईतारापूरमध्ये कांदळवनाच्या जमिनीवर बेकायदा इमारत

तारापूरमध्ये कांदळवनाच्या जमिनीवर बेकायदा इमारत

Subscribe

पालघर तालुक्यातील तारापूर येथील कांदळवनाच्या जागेवर अनधिकृत इमारत बांधल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर दोन बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदळवनाची कत्तल केल्याचा गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.
रमण तारापूरवाला आणि जितेंद्र सोहनलाल जैन या बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तारापूर येथील कांदळवनाच्या जागी 34 गुंठे क्षेत्रावर या बांधकाम व्यावसायिकांनी बेकायदा बांधकाम केले आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत किनारा नियमन क्षेत्र व कांदळवनाचा र्‍हास केल्याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तारापूर येथे झालेल्या या बांधकामासाठी मेरी टाइम बोर्डाकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. बांधकाम करण्यासाठी कांदळवनाची कत्तल केल्याने बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

तारापूर येथील कांदळवनाच्या जागी 34 गुंठे क्षेत्रावर या बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम केले आहे. या क्षेत्रात बांधकाम करण्यास प्रतिबंध घातला असतानाही या बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम केल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. आरोपीने अनधिकृत बांधकाम केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी हे बांधकाम करत असताना नियमानुसार बांधकामाच्या ठिकाणापासून 50 मीटर क्षेत्रापेक्षा जास्त अंतर ठेवणे अपेक्षित असताना केवळ दहा मीटर अंतर सोडून सुमारे 40 मीटर भागावर मातीचा भराव करून त्यावर बांधकाम केले आहे. त्यामुळे कांदळवनाचा र्‍हास झालेला आहे. न्यायालयाने याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. आरोपीने अनधिकृत बांधकाम करून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी तहसीलदारांनी मंडळ अधिकार्‍यांमार्फत या दोघांविरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

- Advertisement -

पालघर तालुक्यातील तारापूर येथील कांदळवनाच्या जागेवर अनधिकृत इमारत बांधल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर दोन बिल्डरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -