घरमुंबईमोखाड्यात ट्रकमधील चोर कप्प्यातील लाखोंची दारु जप्त

मोखाड्यात ट्रकमधील चोर कप्प्यातील लाखोंची दारु जप्त

Subscribe

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

ट्रकमध्ये चोर कप्पे तयार करून त्यातून महाराष्ट्रात बंदी असलेल्या दमण दारूची वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मोखाडा येथे पकडला. यात 11 लाख रुपयांची चोरटी दारु सापडली आली. या कारवाईत दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

भरारी पथकाने ही कारवाई मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास मोखाडा पोलीस चौकीसमोर केली. एका संशयास्पद ट्रकची तपासणी केली असता त्यात एकूण सहा चोर कप्पे तयार करण्यात आल्याचे आढळून आले. त्यात महाराष्ट्रात बंदी असलेल्या दमण बनावटीच्या रॉयल स्पेशल व्हिस्की, रॉयल स्टॅग व्हिस्की, रॉयल चॅलेंज व्हिस्की, हेवडर्स बिअरचे 191 सिलबंद बॉक्स आढळून आले. या दारुची किंमत 11 लाख 6 हजार 880 इतकी असल्याची माहिती भरारी पथकाचे निरीक्षक सुभाष जाधव यांनी दिली. कारवाईत 20 लाख रुपये किमतीचा ट्रक जप्त करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

भरारी पथकाचे निरीक्षक जाधव येत्या 31 जानेवारीला सेवानिवृत्त होत असून यंदाच्या वर्षात त्यांनी केलेली ही मोठी कारवाई आहे. सप्टेंबर 2017 रोजी पालघर भरारी पथकाचा कार्यभार स्वीकारलेल्या जाधव यांनी आतापर्यंत चोरट्या दारुचे 533 गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्याचबरोबर चोरट्या दारुची वाहतूक करणारी 96 वाहने जप्त करून आठ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर अवैध दारु बनवणार्‍या 14 जागा सिलबंद केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -