घरताज्या घडामोडीमुंबईत ऑरेंज अलर्ट; दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मुंबईत ऑरेंज अलर्ट; दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

Subscribe

मुंबईत पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबईत पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. ३ जुलै आणि ४ जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस होईल, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.

- Advertisement -

हवामान खात्याने दिलेली माहिती

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार; मुंबई, ठाणे आणि पालघरमधील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय उत्तर भारतातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहे ऑरेंज अलर्ट?

ऑरेंज अलर्ट म्हणजे कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. तसेच या येणाऱ्या संकटासाठी नागरिकांनी तयार रहावे म्हणून प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात येतो. त्याचप्रमाणे वीजपुरवठा खंडित होणे, वाहतूक ठप्प होण्यासारखे प्रकार घडू शकतात. ही एक प्रकारे पुढच्या संकटाची तयारी असते. गरज असेल आणि महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा असेही या अलर्टमध्ये सांगितले जाते.

- Advertisement -

हेही वाचा – आजपासून ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदरमध्ये लॉकडाऊन


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -