घरमुंबईसातवा वेतन आयोग लागू करा; केडीएमसीत कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

सातवा वेतन आयोग लागू करा; केडीएमसीत कर्मचाऱ्यांचे घंटानाद आंदोलन

Subscribe

महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिकेत कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले.

महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करावी यासाठी आज, बुधवारी कल्याण डोंबिवली महापालिकेत कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील, प्रकाश पेणकर अजय पवार सुनिल पवार मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.

राज्य सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून अनेक दिवस झाले. राज्यातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याची अंमलबजावणी केली. मात्र कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कर्मचाऱ्यांना अद्यापही त्याची प्रतिक्षा आहे. याबाबत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापालिका आयुक्त, महापौर, स्थायी समिती सभापती आदींना वेळोवेळी निवेदन दिले. परंतू त्यावर कोणताही निर्णय न झाल्याने आज घंटानाद आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागल्याची माहिती उपाध्यक्ष रवी पाटील प्रकाश पेणकर यांनी दिली. तसेच १३ तारखेला होणाऱ्या महासभेत या विषयाला मंजुरी द्यावी अन्यथा सामुहीक रजा आंदोलन करण्याचा इशाराही पाटील आणि पेणकर यांनी या वेळी दिला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसात लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी महापालिका प्रशासन आणि महासभेने याबाबत निर्णय घेतला तर ठिक, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा पाटील यांनी दिला.

- Advertisement -

सातव्या वेतन आयोगासाठी केडीएमसी कर्मचाऱ्यांचं घंटानाद आंदोलन

सातव्या वेतन आयोगासाठी केडीएमसी कर्मचाऱ्यांचं घंटानाद आंदोलन

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಬುಧವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 11, 2019

हेही वाचा –

चंद्राबाबू नायडू आणि त्यांचा मुलगा नजरकैदेत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -