घरमुंबईCorona: धारावी कंट्रोलमध्ये, तर माहिम-दादर आऊट ऑफ कंट्रोल!

Corona: धारावी कंट्रोलमध्ये, तर माहिम-दादर आऊट ऑफ कंट्रोल!

Subscribe

धारावी आणि माहिम-दादर या दोन विधानसभा क्षेत्र असलेल्या महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील अधिकाऱ्यांनी आपले सारे लक्ष धारावीकडेच

धारावी आणि माहिम-दादर या दोन विधानसभा क्षेत्र असलेल्या महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील अधिकाऱ्यांनी आपले सारे लक्ष धारावीकडेच केंद्रीत केले. परंतु धारावीतील जनतेची विशेष काळजी घेताना, कुठेतरी येथील महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा माहिम व दादर या विभागांकडे दुर्लक्ष झालेला आहे. सुरुवातील धारावीचा आकडा वाढत असला तरी सध्या येथील रुग्णांची संख्या नियंत्रणात येताना दिसत आहे. परंतु त्या तुलनेत दैनंदिन आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये धारावीपेक्षा आता दादर-माहिम खूप पुढे आहे. त्यामुळे धारावीला कंट्रोलमध्ये आणताना माहिम-दादर हा परिसर आऊट ऑफ कंट्रोल होणार नाही याची काळजी प्रशासनाला घ्यायला हवी.

माहिम-दादरमधील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही मंगळवारपर्यंत ८८६ एवढी होती. यामध्ये माहिमची रुग्ण संख्या ५४९ एवढी तर दादरची रुग्ण संख्या ३३७ एवढी आहे. आज धारावीच्या एकूण संख्येपेक्षा माहिम-दादरची संख्या निमपटीपेक्षा असली तरी अन्य महापालिकेच्या विभाग कार्यालयांच्या तुलनेत अधिकच आहे. विशेष म्हणजे दादर आणि माहिम या विधानसभेत जेमतेम पाच टक्के झोपडपट्टी आहे. उर्वरीत सर्व इमारती व चाळीच आहे. माहिममध्ये पहिला रुग्ण हा वरळीतील जिजामाता नगर येथील मटण विक्रेता होता. पुढे त्याचा मृत्यू झाला. परंतु एमएमसी रोडपासून सुरु झालेल्या संसर्ग माहिम कापड बाजार, कॉजवे, मच्छिमार नगर, पोलिस वसाहत, एमरार्ड कोर्ट, आझाद नगर, मच्छिमार नगर सागर सम्राट, वांझेवाडी,मोगल लेन, कमला रामन नगर, मनमाला टँक रोड आदी ठिकाणी पसरला गेला. माहिममधील प्रमुख हॉटस्पॉट ठरला आहे ता पोलिस कॉलनीचा. त्यानंतर एमरार्ड कोर्टमध्ये सातत्याने रुग्ण आढळून येत आहेत. माहिममधील कोरोनाला पसाराला प्रमुख कारण म्हणजे माहिम येथील एमएमसी क्रॉस रोड येथील तसेच पिकळे नर्सिंग होम जवळी महापालिका मच्छि मार्केट. याठिकाणी धारावी शाहूनगर, लेबल कॅम्पपासून ते दादरपर्यंतचे लोक मासे खरेदीला येतात.

- Advertisement -

मात्र, याठिकाणी मासळी विक्री करताना कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नाही. टि.एच.कटारिया मार्ग,एल.जे. रोड, एमएमसी रोड, रानडे मार्ग आदी मार्गावर काही प्रमाणात भाजी विक्रेत बसत असल्याने लोकांची होणारी गर्दीही तेवढीच कारणीभूत होती. परंतु लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर ते बंद करण्यात आले. परंतु माहिम मच्छिमार नगरमधील रहिवाशांकडून सोशल डिस्टन्सिंग पाळला जात नसल्याने खुद्द स्थानिक नगरसेवक मिलिंद वैद्य यांना प्रशासनाचा विरोधात निषेध म्हणून आंदोलन करण्याची वेळ आली होती.

माझ्या प्रभागात एकूण रुग्णांची संख्या वर पोहोचलेली आहे. यापैकी बरे होवून आलेत. रुग्णवाहिका उपलब्ध न होणे हीच प्रमुख् समस्या आहे. कोणत्याही नॉन कोविड रुग्णांची चाचणी करा,असे सांगितले जाते. पण याचे चाचणी अहवाल वेळीच न मिळाल्याने माझ्या विभागात अशाप्रकारे दोन वृध्द महिला दगावल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने नॉन कोविड रुग्णांचीही तेवढीच काळजी घ्यायला हवी. खरेदीसाठी होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी सोसायटींमध्ये मी बेकरीसाहित्य, भाजीपाला व इतर ग्रोसरी साहित्य उपलब्ध करून दिले.. याशिवाय आतापर्यंत ६९८५ जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.

शीतल गंभीर-देसाई, स्थानिक नगरसेविका, भाजप

तर दादरमध्ये उपेंद्र नगर, मिरांडा चाळ, भवानी शंकर रोड, रानडे मार्ग, कासारवाडी, पोलिस वसाहत, वीर सावरकर मंडई टिळक भवन परिसर, आदी भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. मात्र, माहिमच्या तुलनेत दादरमधील रुग्णांची संख्या कमी आहे. क्रांतीसिंह नाना पाटील मंडई, वीर सावरकर मंडई, मिनाताई ठाकरे फुल मार्केट, फुल विक्रेत तसेच दादरचे फेरीवाले आदी बंद ठेवण्यात आल्याने विभागातील संसर्ग रोखताच आला शिवाय पयार्याने इतर भागातील संसर्ग रोखला गेला. मात्र, येथील सहायक आयुक्त किरण दिघावकर हे सक्षम असले तरी त्यांचे विशेष लक्ष हे धारावीकडेच होते आणि विभागीय वैद्यकीय अधिकारीही तिथे लक्ष ठेवून होते.

- Advertisement -

परिणामी दादर-माहिमकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नव्हता. त्यामुळे आमदार सदा सरवणकर यांनी कोरोना कालावधीत जी-उत्तर विभागात दादर-माहिम विभागासाठी स्वतंत्र सहायक आयुक्त देण्याची मागणी केली. यासंपूर्ण विभागात भाजपची एकमेव नगरसेविका वगळता सर्व शिवसेनेचे नगरसेवक आहेत. मात्र, संपूर्ण विभागात रुग्णवाहिका आणि शव वाहिनी यांचीच प्रमुख समस्या होती. माहिममध्ये आढळून येणाऱ्या रुग्णांना वांद्रे भाभा किंवा शीव रुग्णालयात दाखल करावे.

माझ्या प्रभागात एकूण २७० कोरोना बाधित रुग्णांची संख्या आहे. त्यातील पोलिस वसाहतीत ७० आणि मच्छिमार नगर येथे २५ रुग्ण आढळून आले. परंतु आतापर्यंत ५० टक्के रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. कोरोनात लोक स्वत:च्या पायावर धोंडा मारुन घेत आहे. प्रशासनाचे जराही ऐकत नाही.या विभागात पाच लॉकडाऊन आणि दोन दिवस खुला केला जातो. परंतु लॉकडाऊन उठताच ते अशाप्रकारे रस्त्यावर येतात, की मग वाटते ज्या लोकांना स्वत:च्या जीवाची फिकीर नाही, त्यांच्यासाठी मग आम्ही जीव धोक्यात का घालावा. -मिलिंद वैद्य, स्थानिक नगरसेवक, शिवसेना

जी-उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांनी माहिम विभागातच पोलिस कॉलनीत आतापर्यंत ६० हून अधिक कर्मचारी आढळून आले आहेत. तर हिंदुजा रुग्णालय, ब्रीच कँडी आणि रहेजा रुग्णालयाचे २७ कर्मचारी अशाप्रकारे ८० ते ९० बाधित कर्मचारी आढळून आले. त्यांच्या संपर्कातील किमान तीन ते चार व्यक्ती गृहीत धरल्यास ही संख्या ३०० ते ३५० एवढी होते. एवढेच नाही तर दादर भागात ९ पोलिस कर्मचारी व शुश्रुषा रुग्णालयाच्या नर्सेस व कर्मचारी ११, कासारवाडी महापालिकेचे कासारवाडी येथे १८ कामगार अशा प्रकारे ३८ अत्यावश्यक सेवेतील कामगार आहे. त्यामुळे यासर्वाच्या संपर्कातील संशयित रुग्णांची संख्या पाहता हा आकडा नियंत्रणात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ज्या ज्या प्रकारे सुचना केल्या जात होत्या,त्यानुसार प्रशासन विचार करत कार्यवाही करत होते. पण धारावीकडे अधिक लक्ष असले तरी माहिम आणि दादरकडे कधीच लक्ष कमी केले नव्हते,असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रशासनाचे सर्व लक्ष धारावीकडे असल्याने तसेच एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याला सर्व ठिकाणी लक्ष देता येत नसल्याने दादर-माहिम करता स्वतंत्र विभागीय वैद्यकीय अधिकारी असावा,अशी माझी मागणी होती. भागोजी किर स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीवर कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी शववाहिन्यांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे आसपासच्या लोकांना धोक असल्याने ठराविक वेळेने त्या परिसरात सॅनिटायझेशन करून घेतले जाते. तसेच प्रत्येक इमारत आणि चाळ आम्ही सॅनिटाईज करून घेतलीय. रुग्णवाहिकेची अडचण होती. आता ती अडचणही दूर होईल.

– विशाखा राऊत, स्थानिक नगरसेविका, शिवसेना, सभागृहनेत्या, महानगरपालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -