घरCORONA UPDATE'त्या' करोनाग्रस्ताची हळद-लग्न समारंभात हजेरी; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

‘त्या’ करोनाग्रस्ताची हळद-लग्न समारंभात हजेरी; पोलिसांनी केला गुन्हा दाखल

Subscribe

तुर्केस्थानहून डोंबिवलीत आलेल्या तरूणाने होम क्वारंटाईन न राहता आपल्या नातेवाईकांच्या हळदी समारंभ आणि लग्न सोहळ्यात हजेरी लावल्याने त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तुर्केस्थानहून डोंबिवलीत आलेल्या एका २६ वर्षीय तरूणाने होम क्वारंटाईन न राहता आपल्या नातेवाईकांच्या हळदी समारंभ आणि लग्न सोहळ्यात हजेरी लावल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. तो तरूण करोनाग्रस्त पॉझिटिव्ह झाल्याने अखेर डोंबिवली पोलिसांनी त्या तरूणावर तसेच आयोजकांवरही गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा – Coronavirus: मुंबईत आज २२ नव्या कोरोना बाधितांची नोंद | एकूण रुग्ण १८१

- Advertisement -

करोनाग्रस्तासह आणखी दोघांवर गुन्हा दाखल 

डोंबिवली पूर्वेतील आयरे परिसरात राहणारा हा तरूण १५ मार्चला तुर्कस्थानवरून आला होता. मुंबईत आल्यावर त्याला होम क्वारंटाईनमध्ये राहण्यास सांगण्यात आले होते. पण क्वारंटाईनमध्ये न राहता त्याने १८ आणि १९ मार्च रोजी चुलत भावाच्या हळदी आणि लग्न सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यानंतर सर्दी, खोकल्याचा त्रास झाल्याने त्याला मुंबईच्या कस्तुरबा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर त्याच्या कुटुंबियांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. मात्र निष्काळजीपणा केल्याने पोलिसांनी त्या तरूणावर तसेच लग्नसोहळा आयोजकांवर आणि त्या लग्नासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या अशा तिघांवर कारवाई केली आहे.

राज्यात करोनाचा आकडा वाढतोय

राज्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना शनिवारी २४ नवे रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे यापैकी २२ रुग्ण हे एकट्या मुंबईत आढळले आहेत. कोल्हापूर आणि पालघर मध्ये प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या १८२ वर पोहोचली आहे. तर, सात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. मुंबई आणि उपनगरीय परिसरातील आतापर्यंत १०८ रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -