घरमुंबईकल्याण-डोंबिवलीत ५ वर्षात ८५ हजार लोकांना कुत्र्यांचा चावा

कल्याण-डोंबिवलीत ५ वर्षात ८५ हजार लोकांना कुत्र्यांचा चावा

Subscribe

कल्याण-डोंबिवली शहरात भटक्या कुत्रयांची समस्या भयावह झाली असून भटकी कुत्री चावण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षात तब्बल ८५ हजार ५१३ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात भटक्या कुत्रयांची समस्या भयावह झाली असून भटकी कुत्री चावण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षात तब्बल ८५ हजार ५१३ लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यामुळे शहरात दिवसाला सरासरी ३० ते ४० लोकांना कुत्रे चावा घेतात हे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कल्याण-डोबिवलीकरांना चोर दरोडेखोरांपेक्षा भटक्या कुत्रांची भीती अधिक आहे. स्मार्ट शहराच्या दिशेने पाऊल उचलणाऱ्या कल्याण-डोंबिवलीकरांपुढे भटक्या कुत्र्यांमुळे त्रस्त असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

कल्याण-डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. मात्र त्यावर प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने कल्याण-डेांबिवलीकरांमध्ये नाराजीचा सूर आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी भटक्या कुत्र्यांची माहिती पालिकेकडे मागितली होती. त्यानुसारच पालिकेने ही आकडेवारी त्यांना दिली आहे. महापालिका हद्दीमध्ये २०१२ ते २०१९ पर्यंत ८५ हजार ५१३ व्यक्तींचे कुत्र्यांनी लचके तोडले आहेत. त्यासाठी अॅन्टीरेबीज व्हॅक्सीनवर सुमारे ३ कोटी ४६ लाख ८ हजार ८४३ रूपये खर्च झाल्याची माहितीही पालिकेने दिली आहे. तसेच जानेवारी २०१० ते २०१९ पर्यंत सुमारे ५० हजार ५६३ कुत्रयांवर नसबंदीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. नसबंदी केल्यानंतर त्या कुत्र्याच्या कानावर इंग्रजीतील व्ही आकाराची निशाणी केली जाते. मात्र नसबंदीची निशाणी अजूनही दिसून आली नसल्याची नाराजी म्हात्रे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

२० जूलैच्या महासभेच्यापटलावर त्यांचा प्रश्न ठेवण्यात आला आहे. मात्र एका प्रश्नाला अर्धा तासाचा कालावधी असल्याने हा प्रश्न कोणत्या महासभेत पटलावर चर्चिला जाईल, याचीच प्रतिक्षा म्हात्रे यांना लागली आहे. पहाटे अथवा रात्रीच्या वेळी नव्हे तर दिवसभर कुत्र्यांची भीती उरली आहे. लहान मुलांच्या आणि वृध्दांच्या अंगावर धावून जाणे. तसेच कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कोणत्याही नागरिकांच्या हातात काळी पिशवी दिसली तरी ते त्याच्या पाठी जातात. ती पिशवी हिसकावण्याचा प्रयत्नही कुत्र्यांकडून केला जातो. त्यामुळे कुत्र्यांच्या समस्येला कल्याण-डोंबिवलीकर हैराण झाले आहेत. मात्र कुत्रे अथवा कोणताही प्राणी विनाकारण त्रास देत नाही, त्यांना अपाय होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घेतली पाहिजे, असे प्राणी मित्र संघटनेचे म्हणणे आहे.

एक प्रतिक्रिया

  1. भटके कुत्रे…मारण्याला पर्याय नाही .
    94/95 पर्यन्त BMC दर वर्षी 35/40 हजार कुत्रे शोक देऊन मारत होती. बन्द..प्राणिमित्रानी बन्दी आणावीत . Dec 98 ला हाय कोर्टाने परवानगी दिली व जानेवारी 99 ला स्टे आणला.
    अद्याप नाय उठला ! ??????
    न्यायप्रणालीचा वेग !
    डोक्टर आनंद हर्डीकर डोमबिवली.

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -