घरताज्या घडामोडीवर्षाच्या पहिल्या दिवशी धारावीत २ रूग्णांची नोंद

वर्षाच्या पहिल्या दिवशी धारावीत २ रूग्णांची नोंद

Subscribe

गेल्या काही महिन्यांपासून धारावी परिसरात कोरोनाचा एकही रूग्ण समोर आला नव्हता. मात्र वर्षांच्या पहिल्याच दिवशी २ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीकरांचा धोका अजूनही टळलेला नाही.

मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. मुंबई धारावी परिसरात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते. तेवढ्याच झपाट्याने धारावीतील रूग्ण संख्या कमी झाली होती. कोरोनाचा धारावी पॅटर्न संपूर्ण जगभरात प्रसिद्धा झाला होता. मात्र नवीन वर्षांच्या पहिल्या दिवशीच धारावीमध्ये २ नवे कोरोना रूग्ण समोर आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून धारावी परिसरात कोरोनाचा एकही रूग्ण समोर आला नव्हता. मात्र वर्षांच्या पहिल्याच दिवशी २ कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे धारावीकरांचा धोका अजूनही टळलेला नाही.

कोरोनाच्या काळात धारावी परिसरात सर्वात जास्त कोरोनाबाधित रूग्ण समोर आले होते. धारावीच्या झोपडपट्टी परिसरात ३ हजार ४८३ रूग्ण रिकव्हर झाले आहेत. धारावीमध्ये केवळ १९ एक्टिव्ह रूग्ण होते. २.५ स्वेअर फिटवर पसरलेला धारावी परिसर हा आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखण्यात येते. एकट्या धारावी परिसरात ६. ५ लाख लोकसंख्या आहे. १ एप्रिलला धारावीमध्ये कोरोनाची पहिला रूग्ण सापडला होता. त्यानंतर पुढच्या १५ दिवसात संपूर्ण धारावी परिसरातून मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या समोर आली. धारावीमध्ये पुन्हा रूग्ण समोर आल्याने धारावीकरांचा धोका अजून टळलेला नसल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. दहा बाय दहाची घरे असलेल्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोनाचे सर्वात जास्त रूग्ण समोर आले होते. धारावी झोपडपट्टी कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर होती. तब्बल नऊ महिन्यांनंतर धारावीत एकही कोरोनाबाधित रूग्ण सापडला नव्हता. मात्र २०२१च्या पहिल्या दिवशीच कोरोनाचे नवे २ रूग्ण धारावीतून समोर आले आहेत.


हेही वाचा – मुंबईकरांना लवकरच मिळणार कोरोनाची लस; ७६२ मास्टर ट्रेनर तयार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -