घरCORONA UPDATEपहिल्या पावसात मुंबईकरांचा रस्ता पाण्यात; शहरासह उपनगरांतही तुंबले पाणी

पहिल्या पावसात मुंबईकरांचा रस्ता पाण्यात; शहरासह उपनगरांतही तुंबले पाणी

Subscribe

पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईतील अनेक महत्वाच्या सखल भागांमध्ये पाणी साचून रस्ते पाण्याखाली गेले होते.

निसर्ग चक्रीवादळ पुढे निघून गेल्यानंतर मुसळधार पावसाने मध्यरात्रीपासून लावलेली हजेरी गुरुवारीही कायम होती. मात्र, या पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईतील अनेक महत्वाच्या सखल भागांमध्ये पाणी साचून रस्ते पाण्याखाली गेले होते. कोरोनामुळे आधीच योग्यप्रकारे नालेसफाईचे काम झालेले नाही. त्यातच पहिल्या पावसाने मुंबईकरांना पाण्यातला रस्ता दाखवून दिला. किंग्ज सर्कल, शीव, माटुंगा, मुलुंड, मानखुर्द आदी भाग पाण्याखाली गेले होते. परंतु रस्त्यांवर नेहमीच्या तुलनेत वाहने नसल्याने तेवढा परिणाम दिसून आला नसला तरी काही ठिकाणी या संथगतीने धावणाऱ्या वाहनांमुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसून येत होती. मात्र, पुढील २४ तासांमध्ये शहर व उपनगरांत गडगडाटासह तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

मुंबईत शहर भागात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ४९.६ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली तर उपनगरांत  ४७.० मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली. मात्र, पावसाने बुधवारपासून जोर धरल्याने गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत शहरात ५० मि.मी एवढ्या  पावसाची नोंद झाली होती. तर उपनगरांत २४.८ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली होती. बुधवारी पावसाची संततधार असली तर बुधवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच सकाळी पुन्हा पावसाने जोर धरल्यामुळे सकाळी साडेदहा नंतर माटुंगा येथील गांधी मार्केट, शीव रोड क्रमांक २४, प्रतीक्षा नगर, दादर टि.टि, षण्मुखानंद हॉल, माटुंगा, अँटॉप हिल, मुलुंड एसआयईएस कॉलेज परिसर, मानखुर्द रेल्वे स्थानक आदी ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने मुंबईकरांची एकच त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे वाहतुकीचा मार्ग वळवण्यात आला होता. शीव रोड क्रमांक २४ व गांधी मार्केटच्या ठिकाणी पाणी असल्याने बेस्ट बसेसचा मार्ग इतर रस्त्याने वळवण्यात आला. त्यानंतर येथील पाण्याचा निचरा झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

- Advertisement -

९ ठिकाणी शॉटसर्कीटच्या घटना

मुंबईत पावसामुळे दिवसभरात ६ ठिकाणी घरे पडण्याच्या तथा भिंती पडण्याचा घटना घडल्या आहेत. यामध्ये शहरातील ४ तर पश्चिम उपनगरातील २ घटनांचा समावेश आहे.  तर ९ ठिकाणी शॉटसर्कीटच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये शहरात ७ व पश्चिम उपनगरातील २ घटनांचा समावेश आहे.

एकाच दिवसांत ७० झाडांची पडझड

पावसात धोकादायक झाडे तसेच झाडांची कमकुवत फांद्या तुटून पडण्याची शक्यता असते. दिवसभरात अशाप्रकारे ७० झाडे आणि त्यांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. यापैकी शहरात २९,  पूर्व उपनगरांत २१ आणि पश्चिम उपनगरांत २० अशाप्रकारे एकूण ७० झाडे तसेच त्यांच्या फांद्या तुटून पडल्या आहेत. मात्र, सुदैवाने यामध्ये कुणालाही मार लागलेला नाही.

- Advertisement -

पुढील चार महिनेही मुंबई अशीच तुंबणार- रवी राजा

पहिल्याच पावसात मुंबईतील काही भागा पाण्याखाली जाणे हे या मुंबईत नालेसफाई न झाल्याचे दर्शक आहे. त्यामुळे पहिल्याच पावसात महापालिका प्रशासन नालेसफाईचे काम सक्षमपणे करून घेण्यात पूर्ण अपयशी ठरले आहे. जर पहिल्याच पावसात ही परिस्थिती असेल तर पुढील चार महिने अशाप्रकारच्या किरकोळ  पावसात मुंबईत पाणी तुंबणारच आहे. त्यामुळे पाणी तुंबण्याची कारणे शोधून तसेच सफाई न झाल्यास पुन्हा करून घेतली जावी, असे महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी प्रशासनावर टिका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -