घरमुंबईएकविसाव्या शतकात भारत जगतगुरू बनेल - राज्यपाल

एकविसाव्या शतकात भारत जगतगुरू बनेल – राज्यपाल

Subscribe

"रन फॉर यूथ, यूथ फॉर नेशन मॅरेथॉनचे"आयोजन

भारत देश हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. आजच्या युवकांमध्ये आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी काहीतरी चांगले करत देशाला पुढे नेण्याची क्षमता आहे. या युवाशक्तीमुळे एकविसाव्या शतकात भारत जगतगुरु बनेल, असा विश्वास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला. राज्यपाल यावेळी म्हणाले, स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला भारत करण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करणे आवश्यक आहे. झिरो प्लास्टिक मॅरेथॉन ही एका दिवसापुरती सीमित न राहता प्लॉस्टिक मुक्तीसाठी आपण आग्रही असणे आवश्यक आहे.

परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब म्हणाले, आपण सर्वानी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळणे गरजेचे असून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन ही आपल्या सर्वांची जवाबदारी मानली पाहिजे तरच पर्यावरणाचा होणार र्‍हास थांबेल. आपण प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर करणार नाही, ही सवय लावून घेतली तरच महाराष्ट्र प्रदूषणमुक्त होईल. या कार्यक्रमात खासदार गजानन कीर्तिकर, अमृता फडणवीस, गोपीचंद हिंदुजा यांनी आजच्या प्लास्टिकमुक्त मॅरेथॉनला शुभेच्छा दिल्या. या मॅरेथॉनच्या माध्यमातून “झिरो प्लास्टिक” म्हणजेच प्लास्टिक मुक्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.

- Advertisement -

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून चौथे रन फॉर यूथ, यूथ फॉर नेशन मॅरेथॉनचे आयोजन जुहू चौपाटी येथे करण्यात आले होते. यावेळी परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब, खासदार गजानन कीर्तिकर, अमृता फडणवीस, गोपीचंद हिंदुजा, विवेकानंद युथ कनेक्ट फांऊडेशनचे संस्थापक राजेश सर्वज्ञ, कलाकार दामोदर रामदासी आदी मान्यवर उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -