घरमुंबईकोरोनामध्येही सीईटी परीक्षेच्या नोंदणीमध्ये वाढ

कोरोनामध्येही सीईटी परीक्षेच्या नोंदणीमध्ये वाढ

Subscribe

सीईटी परीक्षेला गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनामध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनामध्ये व्यावसायिक अभ्याक्रमांना विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नोंदणी केली.

कोरोनामध्ये पालक गावाला अडकल्याने किंवा ऑनलाईन समस्येमुळे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात अडचणी आल्या. कोरोनामध्ये अनेक अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांना नोंदणी करणे शक्य झाले नाही. मात्र सीईटी परीक्षेला गतवर्षीच्या तुलनेत यंदा कोरोनामध्येही चांगला प्रतिसाद मिळाला. कोरोनामध्ये व्यावसायिक अभ्याक्रमांना विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात नोंदणी केली.

- Advertisement -

राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना कोरोनामुळे विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे वारंवार मुदतवाढ देण्यात आली. सीईटी सेलमार्फत परीक्षा घेण्यात येणार्‍या व्यावसायिक अभ्यासक्रमांनाही कोरोनामुळे सुरुवातीच्या काळात फारच अल्प प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व नेटवर्कच्या समस्येमुळे सीईटी परीक्षेला नोंदणी करता यावी यासाठी सीईटी सेलकडूनही विद्यार्थ्यांना अनेकदा संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा जास्त विद्यार्थ्यांनी विविध अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या परीक्षांना नोंदणी करणे शक्य झाले आहे. एम.पी.एड, बी.पी.एड, एम.एड, एलएलबी, बीए/बीएससी यासारख्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना गतवर्षीपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना नोंदणी केल्याचे दिसून येते. यामध्ये बी.एड इलेक्टेड आणि विधीच्या तीन व पाच वर्षाच्या अभ्यासक्रमांना मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -