ठाणे जिल्ह्यातील ‘बाल लिंग’ गुणोत्तरात वाढ!

ठाणे जिल्ह्यात बाल लिंग गुणोत्तरात वाढ झाली असून सन २०१८-१९ साली बाल लिंग गुणोत्तराचे प्रमाण ९६० टक्के झाले आहे.

Mumbai
increase in child sex ratio in thane district central government appreciates
ठाणे जिल्ह्यातील 'बाल लिंग' गुणोत्तरात वाढ!

गेल्या तीन वर्षापासून जिल्ह्यात सुरु असणाऱ्या ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ उपक्रमाचा सकारात्म परिणाम दिसून आला आहे. जिल्ह्यात बाल लिंग गुणोत्तरात वाढ झाली आहे. सन २०१८-१९ साली बाल लिंग गुणोत्तराचे प्रमाण ९६० टक्के झाले आहे. २०१७ -१८ साली हे प्रमाण ९४९ होते. त्यामुळे हे प्रमाण वाढले असल्याने केंद्र सरकारच्या महिला व बाल विकास विभागाने जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना अभिनंदनाचे पत्र देखील पाठवले आहे.

केंद्र सरकारने केले कौतुक

जिल्हा कृती दल आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या माध्यमातून २०१७ साला पासून केंद्र सरकारचा हा उपक्रम राबिवला जात आहे. मुलींच्या लिंग गुणोत्तरात वाढ होणे, त्यांना शिक्षण देणे आणि संरक्षण करणे या त्रिसूत्रीला आधारभूत मानून गेल्या तीन वर्षात जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींच्या जन्माविषयी समाजात जाणीव जागृती करण्यात येत आहे. त्यामुळे बाल लिंग गुणोत्तर वाढण्यास मदत झाली आहे. यामध्ये तीन वर्षात बालिका दिवस साजरा करणे, मुलींचा जन्मोत्सव साजरा करणे, मुलीच्या जन्माबद्दल मुलींचे आणि कुटुंबियांचे दवाखान्यात जन्म प्रमाणपत्र व मिठाई देऊन अभिनंदन करणे, मुलगी दत्त घेणे, किशोरी मेळावे घेणे आणि मुलगी असणाऱ्या जोडप्यांना पुरस्कृत करणे, खेळात प्राविण्य मिळालेल्या मुलींचा सत्कार करणे, जिल्हा टास्क फोर्स समितीने सुचवलेले उपक्रम करणे, गुड्डा-गुड्डी बोर्ड लावणे, ५ व्या वर्गातून ६ व्या वर्गात, सातवी ते नववी पर्यंतच्या आणि दहावीतून ते १२ पर्यंतच्या वर्गात जाणाऱ्या मुलींचे १०० टक्के लक्ष साध्य करणाऱ्या शाळा-महाविद्यालयांना ५ हजार अनुदान देणे, दहावी-बारावीला पहिल्या दहामध्ये आलेल्या मुलीना अनुक्रमे ५ आणि १० हजार रोख रक्कम देऊन अभिनंदन करणे आदी उपक्रम हाती घेऊन मुलींच्या जन्माचा सन्मान करण्यात आला आहे. यासाठी अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र आदि ठिकाणाहून व्यापक पद्धतीने कार्यक्रम हाती घेण्यात आले, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी संतोष भोसले यांनी दिली आहे.


हेही वाचा – लाचखोर अधिकारी पुन्हा केडीएमसीच्या सेवेत