घरमुंबईभारतीयांचा स्टार रेटिंग उपकरणे घेण्याकडे वाढतोय कल

भारतीयांचा स्टार रेटिंग उपकरणे घेण्याकडे वाढतोय कल

Subscribe

62 टक्के नागरिकांची असते अधिक पैसे मोजण्याची तयारी

विजेची वाढती मागणी लक्षात घेत 2006 पासून केंद्र सरकारने ‘स्टार रेटिंग’ इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना सुरू केली. सुरुवातीला योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने केलेल्या जनजागृतीमुळे लोकांचा आता पाच स्टार रेटिंग असलेले उत्पादने घेण्याकडे कल वाढलेला आहे. आयआयटी बॉम्बेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये स्टार रेटिंग असलेले फ्रीज, एसीसारख्या वस्तू अधिक किंमत मोजून घेण्यासाठी नागरिक तयार असल्याचे दिसून आले.

संख्याशास्त्र व प्रकल्प अंमलबजावणी मंत्रालयाच्या एका अहवालानुसार भारतात वापरल्या जाणार्‍या एकूण विजेपैकी 22 टक्के वीज रहिवासी क्षेत्रात वापरली जाते. त्यामध्ये एसी, फ्रीज यासारखी उत्पादने वापरण्यावर नागरिकांचा अधिक भर असतो. मात्र, अधिक वीज वापरणार्‍यांमध्ये या उपकरणांचा समावेश होतो. त्यामुळे एसी, फ्रीजच्या वापराचा परिणाम विजेच्या बिलावर अधिक दिसून येतो, परंतु स्टार रेटिंग असलेली यंत्रणा वापरल्यास विजेचा वापर आणि खर्च दोन्ही कमी होतात. त्यामुळे स्टार रेटिंग उत्पादने वापरण्याबाबत ग्राहकांमध्ये जागरुकता आहे हे पाहण्यासाठी आयआयटी मुंबईच्या ‘सेंटर फॉर टेक्नोलॉजी ऑल्टरनेटिव्हस फॉर रुरल एरियास’ आणि ‘इंटरडिसीप्लिनरी प्रोग्राम इन क्लायमेट स्टडीस’मधील संशोधकांनी प्राध्यापक आनंद राव यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन केले. यामध्ये 1.5 टन वातानुकूलीत यंत्रणा वापरताना ग्राहक नेमके कोणते निकष वापरतात याचा अभ्यास केला. यामध्ये उत्पादनांचा ब्रँड, एअर फिल्टर, आवाजाची पातळी, स्टार रेटिंग यापैकी ग्राहक कशाला प्राधान्य देतात याची माहिती घेतली.

- Advertisement -

सर्वेक्षणात सहभागी 70 टक्के लोकांना स्टार रेटिंगबाबत माहिती होती. 48 टक्केे लोकांना स्टार रेटिंग उत्पादने कमी वीज वापरतात याबाबत विश्वास होता, तर 69 टक्के लोकांची दोन स्टार रेटिंगपेक्षा तीन स्टार रेटिंगच्या तर 78 टक्के लोकांची दोन स्टार रेटिंगपेक्षा पाच स्टार रेटिंगच्या उत्पादनांना पसंती असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले. 85 टक्के व्यक्तींनी प्रत्येक उपकरणावर स्टार रेटिंग आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. स्टार रेटिंग घेण्याकडे नागरिकांचा कल असला तरी ती उत्पादने घेण्यासाठी अधिक पैसे मोजण्याचीही नागरिकांची तयारी असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. यामध्ये वातानुकूलित उपकरणे घेण्यासाठी नागरिक 12 हजार 500 पर्यंत अधिक रक्कम मोजण्यासाठी तयार होते. 62 टक्के ग्राहकांची पंचतारांकित उपकरणे विकत घेण्यासाठी अतिरिक्त रक्कम देण्याची तयारी दर्शवली.

वातानुकूलित यंत्रणांवरील स्टार रेटिंग आणि कार्यक्षमतेची इतर मानके प्रभावी ठरतात. याचा पुरावा अभ्यासात सापडला आहे. आजपर्यंत अशा चिन्हांचा ग्राहकांच्या निर्णयावर किती प्रभाव पडतो याचा अभ्यास फक्त गुणात्मक पद्धतीने केला होता. पण या अभ्यासामुळे प्रत्यक्ष अंकांच्या मदतीने चिन्हांचा प्रभाव समजतो.
– डॉ. मनीषा जैन, अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -