घरमुंबईमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी डॉक्टर मंडळीने घेतला पुढाकार

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी डॉक्टर मंडळीने घेतला पुढाकार

Subscribe

मतदानाच्या टक्क्यात वाढ होण्यासाठी तसेच 'लोकशाहीच्या सुदृढ' आरोग्यासाठी 'इंडियन मेडीकल असोसिएशन'च्या (आयएमए) कल्याण शाखेनेही पुढाकार घेतला आहे.

आपल्या आरोग्याची काळजी घेणारी डॉक्टर मंडळी आता ‘लोकशाहीच्या सुदृढ’ आरोग्यासाठीही पुढे सरसावली आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ‘इंडियन मेडीकल असोसिएशन’ कल्याण शाखेनेही (आयएमए) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी जनजागृती मोहीम राबवून फलकही शहरात लावले आहेत. ‘सबसे बडा दाता… भारत का मतदाता…, २९ एप्रिलला मतदान करून लोकशाहीतील सर्वात मोठा उत्सव साजरा करा’ अशा आशयाचा जनजागृतीवर संदेश या बॅनरमधून देण्यात आला आहे. प्रत्येक निवडणुक काळात निवडणूक आयोगाकडून मतदान वाढावे यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निवडणूक आयोग आणि विविध शासकीय यंत्रणा मतदान वाढीसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. कल्याणातील डॉक्टरांची संस्था असलेली इंडियन मेडीकल असोसिएशनने आता पुढाकार घेतला आहे.

मतदानात वाढ होण्यासाठी

कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण पूर्वेत आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिमेत ‘आयएमए’ निवडणूक आयोगाच्या खांद्याला खांदा लावून मतदान जागृतीसाठी प्रयत्न करताना दिसत आहे. कल्याण पूर्व आणि पश्चिमेत ठिकठिकाणी ‘आयएमए’ने मतदान जनजागृतीसाठी बॅनर लावले आहेत. “मतदान न केल्यामुळे काय नुकसान होते ते आपल्या सर्वांना माहिती आहे. तसेच मतदान न केल्यास लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारायचा आपला अधिकारही आपण गमावून बसतो. त्यामूळे लोकशाही बळकट करण्यासाठी, चांगला देश घडवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे.” यासाठीच ‘आयएमए’ सारख्या देशातील डॉक्टरांची नामांकित आणि मोठ्या संघटनाही पुढे सरसावल्याची माहिती कल्याण आयएमएचे सचिव डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -