घरमुंबईरेल्वे अधिकारी आता तहानेसाठी ‘रेलनील’ मागवणार

रेल्वे अधिकारी आता तहानेसाठी ‘रेलनील’ मागवणार

Subscribe

खासगी कंपनीच्या बाटलीबंद पाण्यावरील उधळपट्टी थांबली

इंडियन रेल्वे टुरिझम कॉपोरेशन (आयआरसीटीसी) आणि महापालिकेचे पाणी असूनसुद्धा मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुख्यालयात कर्मचारी आणि अधिकारी महिन्याला खासगी पाण्यावर लाखोंची उधळपट्टी करत असल्याचा धक्कादायक प्रकार दैनिक ‘आपलं महानगर’ने उघडकीस आणला. यासंबंधी वृत्त प्रकाशित होताच मध्य रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. मध्य रेल्वे प्रशासनाने तात्काळ सर्व कार्यालयात रेलनीलचे बॉक्स ठेवण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता रेल्वेच्या कार्यालयात आयआरसीटीसीचे रेलनील बॉक्स दिसून आले आहेत.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी मुख्यालयात कर्मचारी आणि अधिकारी पिण्याच्या पाण्यासाठी इंडियन रेल्वे टुरिझम कॉपोरेशन (आयआरसीटीसी) आणि महापालिकेचे पाणी उपलब्ध असूनसुद्धा दररोज खासगी कंपीनीच्या १०० बॉटल संपवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. या संबंधी वृत्त दैनिक ‘आपल महानगर’ने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. त्यानंतर मध्य रेल्वेच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांमध्ये खळबळ उडाली होती. आयआरसीटीसीचे ‘रेलनील पाणी’ सगळे प्रवासी पित असताना रेल्वेच्या अधिकार्‍यांना आयआरसीटीसीचे आपलेच पाणी नकोसे झाले आहे. यामुळे सर्वसामन्यांच्या पैशाची उधळपट्टी होत असताना रेल्वे अधिकारी मात्र बेफिकीरीने वागत आहेत. महानगराच्या वृत्तानंतर मध्य रेल्वेच्या या कारभारावर सर्व स्तरातून टीका होत होती. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने तात्काळ सर्व कार्यालयात रेलनीलचे बॉक्स ठेवण्याचे निर्देश दिले आहे. सोबतच कार्यालयात येणार्‍या पाण्याचा लेखा-जोखा सुद्धा मागवला आहे. सोबतच रेल्वे कार्यालयात आणि रेल्वे स्थानकांवर पाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एक अधिकार्‍याने दिली आहे.

- Advertisement -

काय होते प्रकरण
सीएसएमटी रेल्वे स्थानकावर मध्य रेल्वेच्या मुख्यालयात महापालिकेचे पाणी येत असूनसुद्धा रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी खासगी कंपनीचे बाटलीबंद पिण्याचे पाणी पित होते. दर आठवड्याला मध्य रेल्वेच्या मुख्यालयात २० लिटरच्या ५०० बॉटल विकत घेण्यात येतात. प्रत्येक दिवशी १०० तर महिन्याला सरासरी १६०० ते २००० बॉटल रेल्वे मुख्यालयात लागतात. विशेष म्हणजे आयआरसीटीसीचे ‘रेलनील’ सगळे प्रवाशी पित असताना रेल्वेच्या अधिकार्‍यांना आयआरसीटीसीचे आपलेच पाणी नकोसे झाले होते. यामुळे सर्वसामन्यांच्या पैशाची उधळपट्टी होत होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -