घरमुंबईइंदौरच्या क्रिकेटपटूची बॅग आणि मोबाईल पळविला

इंदौरच्या क्रिकेटपटूची बॅग आणि मोबाईल पळविला

Subscribe

सीएसएमटी रेल्वे स्थानकातील घटना

मुंबई शहरात क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या इंदौरच्या युवा क्रिकेटपटूची बॅग आणि मोबाईलच अज्ञात चोरट्याने पळविल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात घडली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा नोेंदवून त्याचा शोध सुरू केला आहे. रेल्वे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून या फुटेजवरुन आरोपीचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

देवेंद्र नेटावत हा मूळचा इंदौरचा रहिवाशी असून तो क्रिकेटपटू आहे. इंदौरच्या एका स्थानिक क्रिकेट क्लबमधून तो खेळतो. तीन दिवसांपूर्वी तो मुंबई शहरात आला होता. त्याचा मुंबईत क्रिकेटचा सामना होता. मात्र प्रकृती बिघडल्याने तो पुन्हा इंदौरला जाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकात आला होता. त्याची गाडी उशिरा असल्याने तो प्रतिक्षागृहात बसला होता. तिथेच त्याने त्याचा मोबाईल चार्जिंगसाठी लावला होता. याच दरम्यान तिथे एक तरुण आला आणि त्याला तिथे बसण्यास मज्जाव करु लागला. त्याचे लक्ष विचलित करीत असताना तिथे इतर दोनजण आले. या दोघांनी त्याला कार्यालयात यावे लागेल असे सांगून नेण्याचा प्रयत्न केला.

- Advertisement -

याच दरम्यान इतर दोघांनी त्यांनी त्याची बॅग आणि मोबाईल घेऊन पलायन केले. तो काही वेळानंतर बुकींग हॉलमध्ये गेला, मात्र तिथे कोणीही नव्हते. त्यामुळे तो पुन्हा तिथे आला असता त्याला त्याची बॅग आणि मोबाईल या चोरट्यांनी पळविल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने जवळच असलेल्या रेल्वे पोलिसांना ही माहिती दिली. त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -