घरमुंबईइंडस्ट्रिजना आवश्यक अभ्यासक्रमा देणार भर

इंडस्ट्रिजना आवश्यक अभ्यासक्रमा देणार भर

Subscribe

राज्य सरकारने नुकतीच डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाची स्थापन केली आहे. या विद्यापीठामध्ये देशातील पहिले कॉलेज असलेले एल्फिन्स्टन कॉलेज, सिडनेहॅम, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व बी.एड कॉलेजचा समावेश आहे. या विद्यापीठामध्ये इंडस्ट्रिजना आवश्यक अभ्यासक्रमाबरोबरच संशोधनावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे डॉ. होमी भाभा विद्यापीठातील विद्यार्थी हे अन्य विद्यापीठातील विद्यार्थ्यांपेक्षा नक्कीच वेगळे असतील असा विश्वास इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संचालक डॉ. वसंत हेलावी रेड्डी यांनी व्यक्त केला.

डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा अभ्यासक्रम कसा असेल.
डॉ. रेड्डी – डॉ. होमी भाभा विद्यापीठाचा अभ्यासक्रम हा आम्ही यूजीसीच्या नियमानुसार बनवत आहोत. हा अभ्यासक्रम अन्य विद्यापीठाच्या अभ्यासक्रमापेक्षा पूर्णत: वेगळा असणार आहे. मार्केट किंवा इंडस्ट्रिजला आवश्यक असणार्‍या अभ्यासक्रमावर भर देण्यात येणार आहे. यामध्ये श्रेयांक म्हणजेच चॉईस बेस्ड् केडिट पद्धतीवर अभ्यासक्रम आधारित असणार आहे. अभ्यासक्रम निश्चित करण्यासाठी वेगवेगळे तज्ज्ञ परिश्रम घेत आहेत. यामध्ये कोर्स कोणते असणार, त्यांचा अभ्यासक्रम काय असेल, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण कशा पद्धतीने देण्यात येईल व शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक कसे असेल यावर अभ्यास करण्यात येत आहे.

- Advertisement -

जुना अभ्यासक्रम पूर्णपणे रद्द करण्यात येणार आहे का?
डॉ. रेड्डी – डॉ. होमी भाभा विद्यापीठातील अभ्यासक्रम हा जुना व नव्या अभ्यासक्रमाचा संगम असणार आहे. 70:30 गुणोत्तरात हा अभ्यासक्रम असणार आहे. म्हणजे 70 टक्के अभ्यासक्रम हा यूजीसीच्या नव्या नियमानुसार असणार आहे. तर 30 टक्के अभ्यासक्रम हा जुन्या पद्धतीचा असणार आहे. अभ्यासक्रम ठरवताना इंडस्ट्रिजना आवश्यक असणार्‍या अभ्यासक्रमावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याने जुन्या अभ्यासक्रमातील आवश्यक भागच ठेवण्यात येणार आहे.

अभ्यासक्रम ठरवण्यासाठी समिती नियुक्त केली आहे का?
डॉ. रेड्डी – इंडस्ट्रिजना आवश्यक अभ्यासक्रमावर भर द्यायचा असल्याने व काळानुरुप आवश्यक असणारा अभ्यासक्रम बनवायचा असल्याने आम्ही एक समिती नेमली आहे. या समितीमध्ये कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली चारही संस्थांचे प्रमुख, काही शिक्षक, इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे माजी विद्यार्थी व आयसीटीमधील प्रो. एस.डी. सामंत, प्रो एन.व्ही ठक्कर यांना निमंत्रक म्हणून नियुक्त केले आहे. माजी विद्यार्थ्यांकडून श्रेयांक पद्धत कशी असावी, परीक्षा पद्धत कशी असावी अभ्यासक्रम कसा असावा यासाठी विविध सूचना करण्यात येत आहेत.

- Advertisement -

माजी विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी कसा उपयोग होईल
डॉ. रेड्डी – इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिकलेले अनेक विद्यार्थी हे मोठे उद्योजक झालेले आहेत. तर काही विद्यार्थी हे आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये मोठ्या कंपन्यांमध्ये कामाला आहेत. तर बहुतेक विद्यार्थी हे युरोप, अमेरिकासह जगभरामध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा सध्याच्या विद्यार्थ्यांना व्हावा यादृष्टीकोनातू त्यांची आम्ही मदत घेत आहोत.

विद्यापीठामध्ये बी.एड अभ्यासक्रमावर कशा पद्धतीने असेल.
डॉ. रेड्डी – विद्यार्थ्यांना बीए, बीएसस्सी करता करता बीएड करता यावा अशा पद्धतीने इंटिग्रेटेड अभ्यासक्रम राबवण्याचा आमचा विचार आहे. बीएडचा अभ्यासक्रम ठरवणार्‍या एनसीईटी भोपाळ या संस्थेशी चर्चा करून काही बदल करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शिवाजी विद्यापीठात बीएबीएड हा चार वर्षाचा अभ्यासक्रम आहे. त्याचप्रमाणे बीए इग्लिश, बीए हिंदी, बीए जिओग्राफी, बीए इकोनॉमिक्स हा अभ्यासक्रम करणार्‍या विद्यार्थ्यांना बीएडचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा विचार आहे. इंटिग्रेटेडमध्ये पदवी अभ्यासक्रमाबरोबरच बीएडचा अभ्यासक्रम पहिल्या वर्षापासूनच शिकवण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या एखाद्या विद्यार्थ्यासाठी हा उत्तम पर्याय असणार आहे. तसेच त्यांना एमए, एमएस्सीबरोबरच संशोधनाची संधी मिळू शकते.

संशोधन वाढवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात
डॉ. रेड्डी – आपल्या संस्थेतून प्रथम येणार्‍या विद्यार्थ्याला फेलोशिप किंवा स्कॉलरशिप दिली जाते. सध्या संस्थेमध्ये काही प्रकल्प असे आहेत की ज्यामध्ये काम करणार्‍या विद्यार्थ्यांना शिकताना 25 ते 55 हजारापर्यंत फेलोशिप मिळत आहे. एच इंडेक्समध्ये मुंबई विद्यापीठापेक्षा आमच्या संस्थेचे अधिक प्रकल्प आहेत. एल्फिन्स्ट देशातील पहिले कॉलेज आहे. सिडनेहॅम कॉमर्समध्ये तर बीएडसुद्धा भारतातले पहिले कॉलेज आहे. इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही विज्ञान संशोधनातील देशातील पहिली संस्था आहे. त्यामुळे संशोधनावर आता अधिक भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानातून 55 कोटी विद्यापीठाला मिळणार आहेत. यातून इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मदत होणार आहे. तसेच यूजीसीला संलग्न असल्याने वेगळा निधी मिळणार आहे. त्यामुळे संशोधनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल. त्याचा फायदा संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांना होणार आहे. आम्ही सध्या मॅथमेटिक्स, स्टॅटिस्टिक व इकोनॉमिक्समध्ये संशोधनावर भर देण्यात येणार आहे.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -