अमानुषपणा! १० रुपयांचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

दहा रुपयांचे आमिष दाखवत एका पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुंबईमध्ये घडली आहे.

assaulted
अत्याचार

दिवसेंदिवस मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दररोज एक घटना ऐकायला येत असून नुकतीच एक घटना मुंबईमध्ये घडली आहे. एका ५ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. १० रुपये देण्याचे आमिष दाखवून शेजारी राहणाऱ्या ५९ वर्षाच्या नराधामांनी ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

नेमके काय घडले?

पीडित चिमुकली हातात १० रुपयांची नोट घेऊन आली. त्यावर आईने तिला पैशाबाबत विचारणा केली असता ही घटना समोर आली आहे. आईने चिमुरडीला याबाबत विचारणा केल्यानंतर मुलीने आईला सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने धारावी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. याप्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीला अटक केली असून पॉक्सोचा गुन्हा दाखल केला आहे.

अलीकडेच ठाण्यातील कोविड सेंटरमध्ये लाजिरवाणी घटना घडली होती. याप्रकरणी एका २७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. या नराधमाने एका २० वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता.


हेही वाचा – Corona in Maharashtra: राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक! आज १७,०६६ नव्या रुग्णांची नोंद