घरमुंबईयुथच्या ढिसाळ नियोजनाची चौकशी होणार

युथच्या ढिसाळ नियोजनाची चौकशी होणार

Subscribe

आपलं महानगरच्या वृत्ताची मॅनेजमेंट कौन्सिलने घेतली दखल

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलच्या आयोजनाच्या ढिसाळ नियोजनामुळे यंदा विद्यार्थ्यांना फटका बसल्याचे वृत्त आपलं महानगरने नुकतेच प्रकाशित केले होेते. आपलं महानगरच्या या वृत्ताची दखल मुंबई विद्यापीठ प्रशासनाने घेतली असून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. यासाठी विशेष समिती गठित करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलने घेतला आहे. लवकरच या समितीची घोषणा करण्यात येणार आहे. मुख्य म्हणजे, आगामी युथ फेस्टिवलच्या आयोजनासाठी सिनेट सदस्यांचा समावेश असलेली समिती गठीत करण्याची मागणी ही यावेळी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ पातळीवर युथ फेस्टिवल आयोजित करण्यात येतो. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत या सर्व युथ फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत असते. यंदा ढिसाळ आयोजनामुळे युथ फेस्टिवल वादाच्या भोवर्‍यात अडकले आहे . ज्यात प्रामुख्याने युथ फेस्टिवलच्या गायन स्पर्धा आणि सामूहिक गायन स्पर्धेच्या अंतिम फेरीत ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

- Advertisement -

यासंदर्भातील प्रथम वृत्त आपलं महानगरने ८ सटेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे वरील दोन्ही स्पर्धांचे आयोजन अगोदर गिरगाव येथील विल्सन कॉलेजमध्ये करण्यात केले होते. मात्र ऐन वेळी स्पर्धेचे ठिकाण बदलून ही स्पर्धा चर्चगेट येथील शाहीर अमर शेख सभागृहात आयोजित करण्यात आली. त्यामुळे स्पर्धकांची चांगलीच तारांबळ उडाली. तर एकांकिका स्पर्धा रात्री १ वाजेपर्यंत सुरू असल्याचा प्रकार यंदा समोर आला होता. त्यामुळे या ढिसाळ नियोजनाचा प्रश्न नुकत्याच झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलच्या बैठकीत चांगलाच गाजला होता. त्यावेळी या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय झाला असून मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्रदीप सावंत यांच्यासह इतर तीन सदस्यांची समिती गठीत करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाचा युथ फेस्टिवलमध्ये भोंगळ कारभार

युथ फेस्टिवल हे विद्यार्थ्यांच्या सोयीकरीता असते. पण यंदा विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे ही समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर यापुढे अशाप्रकारच्या घटना पुन्हा होऊ नयेत आणि या विभागाला देण्यात येणारा निधी योग्य प्रकारे वापरला जावा यासाठी एक सिनेट सदस्यांचा समावेश असलेली समिती गठीत करावी, अशी मागणी आम्ही केली असल्याचे चौकशी समितीबाबत बोलताना मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्रदीप सावंत यांनी आपलं महानगर ला सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -