घरमुंबईबेस्टची बैठक तहकूब, प्रशासनाकडून समिती अध्यक्षांसह सदस्यांचा अवमान

बेस्टची बैठक तहकूब, प्रशासनाकडून समिती अध्यक्षांसह सदस्यांचा अवमान

Subscribe

साडेतीन तासांची प्रदीर्घ चर्चा झाली आणि सर्वपक्षीय बेस्ट समितीने प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करीत सभा तहकूब केली तर काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग करीत तीव्र नाराजी व्यक्त केली.

मानापमान नाट्यामुळेच शेकडो वर्षांपूर्वी महाभारत व रामायण घडले होते. बेस्ट उपक्रमातही काही दिवसांपूर्वी एका पाहणी दौऱ्याप्रसंगी बेस्ट प्रशासनाचा एकही अधिकारी हजर न राहिल्याने बेस्ट समिती अध्यक्षांसह सदस्यांचा घोर अपमान झाला. ही बाब समितीच्या जिव्हरी लागली. त्यामुळे आज त्याचे पडसाद बेस्ट समिटीच्या बैठकीत उमटले व त्यावर साडेतीन तासांची प्रदीर्घ चर्चा झाली आणि सर्वपक्षीय बेस्ट समितीने प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करीत सभा तहकूब केली तर काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग करीत तीव्र नाराजी व्यक्त केली.

सायन येथील प्रतीक्षा नगर आगारातील एका पडीक शेडच्या पाहणीसाठी बेस्ट समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे व बेस्ट समितीच्या नऊ सदस्यांनी १२ डिसेंबर रोजी पाहणीदौरा केला होता. मात्र याप्रसंगी बेस्ट प्रशासनातर्फे एकही अधिकारी उपस्थित नव्हता. त्यामुळे बेस्ट समिती अध्यक्ष प्रविण शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय समिती सदस्यांचा घोर अपमान झाला. परीणामी बेस्ट समिती अध्याक्षांसह सदस्यांनी पाहणी दौऱ्यावर बहिष्कार टाकला होता. या अपमानास्पद घटनेचे तीव्र पडसाद आज बेस्ट समितीच्या बैठकीत उमटले. भाजप सदस्य सुनील गणाचार्य यांनी या मानापमान नाट्याचा विषय उपस्थित करीत बेस्ट प्रशासनाला चांगलाच जाब विचारत फैलावर घेतले.

- Advertisement -

बेस्टच्या संबंधित अधिकाऱ्यांचा व प्रशासनाचा एकूणच बेफिकीरपणा, हलगर्जीपणा आणि उद्धटपणाचा चव्हाट्यावर आणत गणाचार्य यांनि तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत सभा तहकूबी मांडली. त्यावर सर्वपक्षीय सदस्यांनी त्यास पाठींबा देत बेस्ट प्रशासनावर आगपाखड करीत चांगलीच तोफ डागली. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांना बेस्टच्या एसी सभागृहात चांगलाच घाम फुटला. सदर सभातहकुबीवर सर्वपक्षीय सदस्यांनी तब्बल साडेतीन तास चर्चा केल्याने दिवसभरात कोणतेही कामकाज होऊ शकले नाही. अखेर अध्यक्ष प्रविण शिंदे यांनी सभा तहकूब केली.

बेस्ट समितीमधील शिवसेनेचे सदस्य अनिल कोकीळ,आशिष चेंबूरकर,अनिल पाटणकर तसेच विद्यमान अध्यक्ष प्रवीण शिंदे यांनी प्रशासनावर टीकेची झोड उडवली मात्र शिवसेनेचेच सदस्य सुहास सामंत यांनी महाव्यवस्थापक डॉ.सुरेंद्रकुमार बागडे यांच्यावर स्तुतीसुमने उधळत त्यांची पाठराखण केल्याने बेस्ट वर्तुळात व समिती बैठकीत आश्चर्य व्यक्त करण्यात आले आणि वेगळ्याच चर्चेला उधाण आले.

- Advertisement -

हेही वाचा – नाताळच्या सुट्ट्या मिळणार का?; शिक्षकांची शालेय शिक्षण विभागाकडे विचारणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -