घरमुंबईजे जे हॉस्पिटलमध्ये शिकाऊ महिला डॉक्टरची छेडछाड

जे जे हॉस्पिटलमध्ये शिकाऊ महिला डॉक्टरची छेडछाड

Subscribe

जे. जे. हॉस्पिटलमधील एका शिकाऊ महिला डॉक्टरची छेडछाड करण्यात आली आहे. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी कक्षसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

जे. जे. हॉस्पिटलमधील एका शिकाऊ महिला डॉक्टरची छेडछाड करण्यात आली आहे. या प्रकरणी जे. जे. मार्ग पोलिसांनी कक्षसेवकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. यापूर्वीही या कक्षसेवकाविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला कामावरुन काढून टाकल्याचे जे. जे. मार्डकडून सांगण्यात आले आहे.

गजेंद्र गोसावी (वय 30) असे वॉर्डबॉयचे नाव आहे. शुक्रवारी रात्री शिकाऊ महिला डॉक्टर रुग्णाला तपासण्यासाठी गेली असता गोसावी तिच्या मागे गेला आणि त्याने तिला पाठीमागून पकडून जबरदस्ती केली. महिला डॉक्टरने आरडाओरडा करताच त्याने पळ काढला. या घटनेनंतर डॉक्टरने हा प्रसंग अन्य डॉक्टरांना सांगितला. त्यानंतर जे जे मार्ग पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. गोसावीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेला जे जे मार्डने दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर जेजेच्या अधिष्ठात्यांनी त्याच्यावर कारवाई करत त्याला कामावरून काढून टाकल्याचे जेजे मार्डकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -