आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धा : नालंदा भारतनाट्यम नृत्य निकेतनचा प्रथम क्रमांक

ठाण्यातील नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतन या संस्थेने या नृत्य स्पर्धेत भाग घेऊन सेमी क्लासिकल या गटात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल व ट्रॉफी मिळवीत परदेशात ठाण्याचे नाव उंचावलं आहे.

Thane

ठाण्यातील नालंदा भारतनाट्यम नृत्य निकेतन या संस्थेने थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत सेमी क्लासिकल गटात प्रथम क्रमांक पटकावून परदेशात ठाण्याचे नाव उंचावले आहे. पदन्यास इंटरटेनमेंटच्या मेघा संपत यांनी नुकतीच ‘इंडियाज इंटरनॅशनल ग्रुव फेस्ट सीजन टू’ ही आंतरराष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धा बँकॉक,थायलंड येथे आयोजित केली होती. ठाण्यातील नालंदा भरतनाट्यम नृत्य निकेतन या संस्थेने या नृत्य स्पर्धेत भाग घेऊन सेमी क्लासिकल या गटात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडल व ट्रॉफी मिळवीत परदेशात ठाण्याचे नाव उंचावलं आहे.

मागील ५ वर्षांपासून सुवर्ण पदकावर नाव

‘स्त्री शिक्षण व महिला सशक्तीकरण’ या विषयावरील संस्थेने नृत्य सादर केले. या विशिष्ट नृत्याविष्काराची रचना संस्थेच्या संचालिका गुरु के. शोभना यांनी केली होती. ज्येष्ठ नृत्यांगना सुधा चंद्रन, नृत्यदिग्दर्शक आशिष पाटील, वैभव घुगे व सुशांत पुजारी अशा दिग्गज कलाकारांनी या स्पर्धेचे परीक्षण केले. या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन सर्व नृत्य प्रेमींना लाभले. ठाणे, मुंबई, उज्जैन, ओरिसा, दुबई, सिंगापूर अशा निरनिराळ्या ठिकाणाहून अनेक स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यामुळे २ नोव्हेंबर २०१९ या दिवशी झालेल्या या नृत्य स्पर्धेत सर्वांचाच चांगला कस लागला. यामध्ये सेमी क्लासिकल या गटात नालंदा भारतनाट्यम नृत्य निकेतन संस्थेने प्रथम क्रमांक पटकावला. अशाच नृत्य स्पर्धांमध्ये नालंदाच्या विद्यार्थिनी गेली पाच वर्षे सुवर्णपदक मिळवत आहेत. याचे सर्व श्रेय गुरु के. शोभना यांच्या कोरियोग्राफीला जाते त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक या स्पर्धेत करण्यात आले. बँकॉक येथील स्पर्धेत अस्मिता विचारे, श्वेता राणे, रसिका महाडिक, सिद्धी लोटणकर व इशिका खोल्लम या विद्यार्थिनींनी भाग घेतला. सर्व नृत्य प्रेमींना आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढे मोठे व्यासपीठ मिळवून दिल्याबद्दल पदन्यास एंटरटेनमेंटच्या मेघा संपत यांचे नालंदा संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here