घरमुंबईडॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय डॉक्टरांची मदत

डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय डॉक्टरांची मदत

Subscribe

जगभरातील इतर देशांमध्ये मात्र रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले होण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळेच, वर्ल्ड मेडिकल असोसिएशनकडून या हल्ल्यांची दखल घेण्यात आली असून त्यावर चर्चा करण्यात येणार आहे.

रुग्णालयातील डॉक्टर, सुरक्षारक्षक यांच्यावरील हल्ले कमी होत नसून हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी रात्री उशिरा नागपूर येथे आयजीएमसी म्हणजेच इंदिरा गांधी रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांवर हल्ला झाला. रुग्णालयावरील या हल्ल्याविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने लढा देण्यास सुरु केला असून आता या लढ्यात वर्ल्ड मेडिकल असोसिएशन सहभागी होणार आहे.

डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण वाढले

मुंबईसह राज्यात होणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्ले या विषयावर पहिल्यांदाच जागतिक परिषदेत वर्ल्ड मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. भारतातील डॉक्टारांना रुग्णांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. यात रुग्णालय आस्थापनेची तोडफोड आणि डॉक्टरांना जबरी मारहाण करण्यात येते. डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनकडून गेल्या वर्षभरात मोहीम छेडण्यात आली आहे. चर्चासत्रे, परिषद आयोजित करुन यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. जगभरातील इतर देशांमध्ये मात्र रुग्णांच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले होण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळेच, वर्ल्ड मेडिकल असोसिएशनकडून या हल्ल्यांची दखल घेण्यात आली असून त्यावर चर्चा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

आयएमएकडून चर्चासत्राचे आयोजन

८ आणि ९ फेब्रुवारीला मुंबईत हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले असल्याचे आयएमएकडून सांगण्यात आले. वर्ल्र्ड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. लिओनीड एडमॅन आणि जनरल सेक्रेटरी डॉ. ओत्मार क्लोईबर या बैठकीत सहभागी होणार आहेत. याशिवाय, इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन, मेडिकल असोसिएशन आणि भारतीय आयएमएचे प्रतिनिधीही या बैठकीत सहभागी होणार आहेत.

“एखादा डॉक्टर करिअर करताना त्याला उगीचच त्याच्यावर होणाऱ्या अत्याचाराला सामोरे जावे लागते. अशा हिंसक हल्ल्यांमुळे आरोग्य क्षेत्रात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्ल्र्ड मेडिकल असोसिएशन पहिल्यांदाच सहभागी होत आहे. जागतिक पातळीवरील भारतात ही पहिल्यांदाच अशी परिषद होत आहे. वर्ल्ड मेडिकल असोसिएशनकडूनही गंभीर दखल घेतली आहे. आयएमएने केलेल्या सर्वेक्षणानुसार ७२ टक्के डॉक्टरांना त्यांच्या करिअरमध्ये शारीरिक आणि शाब्दिक छळाला सामोरं जावं लागत आहे. यावर चर्चेसाठी इंडियन मेडिकल ऑफ असोसिएशनने आंतरराष्ट्रीय बैठक आयोजित केली आहे.” –  डॉ. जयेश लेले, राष्ट्रीय सचिव, हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया, आयएमए

महाराष्ट्रात डॉक्टरांवर झालेले हल्ले

एप्रिल २०१७ – धुळे जिल्हा रूग्णालयातील निवासी डॉ. रोहन मामुनकर यांना मारहाण

- Advertisement -

मार्च २०१८ – पिंपरीच्या डी.वाय.पाटील वैद्यकीय विद्यापीठात डॉक्टरवर हल्ला

मार्च २०१८ – मुंबईच्या जी. टी. रुग्णालयातील डॉ. विश्वजीत वाडकेंसोबत धक्काबुक्की

२५ एप्रिल – औरंगाबादच्या घाटी रुग्णालयातील निवासी डॉक्टर हर्षल चव्हाण यांना मारहाण

८ मे २०१८ – नागपूरच्या इंदिरा गांधी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर आणि नर्सवर हल्ला

१९ मे २०१८ – मुंबईतील जे.जे. रुग्णालयातील2 निवासी डॉक्टरांना मारहाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -