Sunday, January 24, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई इक्बाल मिर्चीचा हस्तक हुमायूँ मर्चंटला मुंबईतून अटक!

इक्बाल मिर्चीचा हस्तक हुमायूँ मर्चंटला मुंबईतून अटक!

ईक्बाल मिर्चीचा हस्तक हुमायूँ मर्चंटला ईडीनं मुंबईतून अखेर अटक केली आहे.

Related Story

- Advertisement -

दाऊद इब्राहिमचा राईट हँड इक्बाल मिर्चीचा हस्तक मानल्या जाणाऱ्या हुमायूँ मर्चंटला ईडीनं मुंबईतून अटक केली आहे. इक्बाल मिर्चीची अनेक बनावट कागदपत्र, त्याच्या नावाची पॉवर ऑफ अॅटर्नी त्याच्याकडून हस्तगत करण्यात आली आहे. अटकेनंतर हुमायूँ मर्चंटला मुंबई न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. इक्बाल मिर्चीने मुंबई आणि देशभरात घेतलेल्या अनेक मालमत्तांच्या प्रकरणामध्ये हुमायूँला अटक करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. भारतात इक्बाल मिर्चीच्या नावे किमान ६ ते ७ मालमत्ता असल्याचं ईडीला तपासामध्ये आढळून आलं आहे. त्याशिवाय, लंडन आणि सौदी अरब अमिरातीमध्ये देखील त्याच्या नावे किमान २५ मालमत्ता असल्याचं तपासात समोर आलं आहे. याच इक्बाल मिर्चीशी संबंध असल्याच्या संशयावरून ईडीने दोन दिवसांपूर्वी माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची चौकशी केली होती.

- Advertisement -

दक्षिण मुंबईमध्ये सीजय हाऊस या घराच्या घरेदीवेळी प्रफुल्ल पटेल यांनी इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांसोबत करारनाम्यावर सह्या केल्या होत्या. हे घर इक्बाल मिर्चीच्या नावावर आहे. प्रफुल्ल पटेल यांनी ईडीने चौकशी करताना यासंदर्भातली अनेक कागदपत्र आणि या प्रकरणातील इतर महत्त्वाच्या व्यक्तींसमोर त्यांची चौकशी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी हुमायूँ किंवा त्याचा मेव्हणा मुश्ताक मेमन याच्याशी कोणताही संबंध नसल्याचं म्हटलं आहे. या दोघांनी देखील मिर्चीने मुंबईत मालमत्ता कशी खरेदी केली, याचा तपशील चौकशीत दिला आहे.

काय आहे प्रकरण?

प्रफुल्ल पटेल यांच्या मिलेनियम डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेड आणि इक्बाल मिर्चीचा मुलगा आसिफ मेमन या दोगांमध्ये या मालमत्तेच्या व्यवहारापोटी कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचे पुरावे ईडीला मिळाले असल्याचं सांगितलं जात आहे. आसिफ मेमनने ही रक्कम मिलेनियम डेव्हलपरच्या खात्यामध्ये टाकल्याचं देखील सांगितलं जात आहे. मिर्चीने त्याची पत्नी हजरा, मुलगा आसिफ आणि जुनैद यांच्या नावे घेतलेल्या मालमत्तेसाठीच ही रक्कम ट्रान्सफर केली असल्याचा ईडीला संशय आहे. मिलेनियम डेव्हलपर्सने वरळी भागात असलेल्या सीजय हाऊस या गगनचुंबी इमारतीचं बांधकाम केलं आहे. याच इमारतीमधल्या १४ हजार चौरस फुटांच्या डुप्लेक्स फ्लॅटची विक्री इक्बाल मिर्चीच्या कुटुंबियांना करण्यात आली होती.

- Advertisement -