घरमुंबईआयआरसीटीसी अजब कारभार

आयआरसीटीसी अजब कारभार

Subscribe

मोबाईल तिकीटमुळे गोधळ, कन्फर्म तिकीट झाली नॉट कन्फर्म

वाढत्या मोबाईल आरक्षित तिकीटमुळे प्रवाशांना मध्ये गोंधळ दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्याच सरळ सरळ भुर्दड आता एक प्रवाशांला बसला आहेत. आयआरसीटीसी एप मध्ये कन्फर्म झालेली तिकीट पुन्हा नॉट कन्फर्म झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे एका प्रवाशाला चांगलीच पायपट्टी झाली असून त्याने आपली गर्भवती पत्नीला आणि वयोवृद्ध आईला रेल्वे गाडीतून उतरून थेट खासगी वाहनाच्या मदतीने पुढचा प्रवास करावा लागला आहे. त्यामुळे त्याचे चांगले हाल झाले आहे. मात्र या घटनेमुळे आयआरसीटीसी या भोंगळ कारभावर सर्व स्तरातून विरोध होत आहे.

ट्रेन क्रमांक 12901 गुजरात मेल गाडी मुंबईहुन-अहमदाबाद दरम्यान धावणारी ही मेल गाडी आहेत. धवल पटेल या प्रवाशाने २८ आगस्टला गुजरात मेल गाडीचे बोरिवली ते नरियालसाठी तीन सिलीपर तिकीट ७ डिसेंबरसाठी काढण्यात आल्या होत्या. तेव्हा या तिन्ही तिकीट १, २ आणि ३ असे वेटिंग मध्ये होते. त्यानंतर धवल पटेलने ७ डिसेंबर ला रात्री ६ वाजता तिकिटाचे करंट स्टेट्स आयआरसीटीसीच्या ऍपवर चेक केले. तेव्हा तिन्ही तिकीट कन्फर्म झाले आढळून आले होते. मात्र गुजरात मेल गाडीच्या चार्ट प्रीपेट झाला नव्हता. जेव्हा गुजरात मेल गाडीच्या चार्ट प्रीपेट झाला. तेव्हा त्यांच्या तिन्ही तिकीट नॉट कन्फर्म झाल्यामुळे त्यांना धावत्या गाडीतून उतरावे लागले आहे.

- Advertisement -

या प्रवासात धवल पटेल बरोबर त्यांची गर्भवती पत्नी व वयोवृद्ध आई होती. पटेल कुटूंबीय बोरिवलीतुन गुजरात मेल गाडीत चढले तेव्हा त्यांना आपली तिकीट कन्फर्म न झाल्याच लक्षात आले. त्यामुळे ते पुढील पालघर स्थानकांवर उतरून त्यांना खासगी वाहनातून पुढील प्रवास करावा लागला आहे. कारण गर्भवती पत्नी व वयोवृद्ध आई असल्यामुळे पटेल कुटूंबिया वेटिंग मध्ये प्रवास करणे अशक्य होते. म्हणून पुढील प्रवास खासगी वाहनातून करावा लागला. अशी माहिती दैनिक आपलं महानगराला धवल पटेल यांनी दिली आहे. मात्र या आयआरसीटीसी अजब कारभारमुळे पटेल कुटूंबियांना मोठ्या प्रमाण हाल अपेष्टा सहन करावे लागले आहे. सोबतच या संबंधीत आम्ही आयआरसीटीसीचे जनसंपर्क अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता. आमच्या संपर्क होऊ शकला नाही.

तांत्रिक बिघाड
वेटिंग मध्ये असलेली रेल्वेची तिकीट चार्ट प्रीपेट झाल्यावरच सुद्धा आपली तिकीट आरक्षित किंवा अनआरक्षित झाल्याची माहिती मिळते. मात्र आयआरसीटीसीच्या ऍपवर रेल्वे तिकिटाच्या पीएनआर नंबर टाकला तर चार्ट प्रीपेट होण्या आगोदर आपल्या तिकिटीच्या करंट स्टेट्स काय आहेत ? हे पाहता येते. त्यानुसार प्रवासी सुद्धा आपल्या प्रवासाच गणित जुळवता. त्याच प्रमाणे धवल पटेल यांनी आपली वेटिंग मध्ये असलेल्या तिन्ही तिकिटीचे करंट स्टेट्स चेक केले. तेव्हा त्यांच्या तिन्ही तिकीट आरक्षित झाल्या होत्या. मात्र काही वेळातच नॉट कन्फर्म झाल्या. या संबंधित विचारणा केली असतात तांत्रिक बिघाड असल्याचं सांगण्यात आले आहे. आयआरसीटीसी तिकीट आरक्षण ऍपवर येणार्‍या या तांत्रिक अडचणी संबंधित खूपदा तक्रारी आल्या आहे. यासंबंधित आम्ही सुद्धा आयआरसीटीसीला ही गोष्ट लक्षात आणू दिली आहेत. मात्र वारंवार कसली ही दखल घेत नसल्यामुळे आज या घटना वाढत जात आहे. त्यामुळे प्रवाशांना यांच्या भुर्दड सहन करावे लागत आहेत. अशी माहिती रेल्वेच्या एक अधिकार्‍यांनी नाव न छापण्याचा अटीवर दैनिक आपलं महानगरला दिली आहे.

- Advertisement -

कन्फर्म झालेली तिकीट आयआरसीटीसी ऍप मध्ये नॉट कन्फर्म दाखवते ही घटना आयआरसीटीसीची ही मोठी निष्काळजीपणा आहे. मात्र यावर रेल्वे मंत्रालयाकडून त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे असे प्रकरण नेहमीच समोर येत आहे. त्यांचे भुर्दड रेल्वे प्रवाशांना भोगावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी आयआरसीटीसीवर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून भविष्यात असे प्रकरण घडणार नाही.
सुभाष हरिशचंद्र गुप्ता – अध्यक्ष, रेल यात्री परिषद

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -