जाणून घ्या, तिकीट बुकिंग करण्यासाठी IRCTC चे नवे नियम

रेल्वे तिकिटांच्या ऑनलाइन बुकिंगला अधिक सोयिस्कर करण्यासाठी भारतीय रेल्वे खात्याने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत

भारतीय रेल्वे

देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप सुरू आहे. असे असले तरी सध्या कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात येत आहे. कोरोना दरम्यान लॉकडाऊन करण्यात आल्याने वाहतूक सेवा बंद करण्यात आली असली तरी रेल्वे मंत्रालयाने नागरिकांच्या सुविधेसाठी कोरोना काळातही अनेक ट्रेन सोडल्या असल्या तरी कोरोना दरम्यान ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची खबरदारीसुद्धा रेल्वेने घेतली. इंडियन रेल्वे कॅटेरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) तिकीट बुकिंगसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IRCTC तील नियमांमध्ये काही बदल केले आहेत.

असे आहेत IRCTC चे बदलले नियम

IRCTC ने आता निर्णय घेतला आहे की, दुसरा रिझर्व्हेशन चार्ट ट्रेनच्या सुटण्याच्या ३०मिनिटे आधी तयार केला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून, कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे, ट्रेनमध्ये बर्थ बुक केलेल्या प्रवाशांना सूचित करण्यासाठी दुसरा चार्ट दोन तासांपूर्वी तयार केला जात होता.

  • कोरोना संकटाच्या पूर्वी IRCTC रेल्वे सुटण्यापूर्वी चार तास आधी पहिला चार्ट प्रसिद्ध करीत होती. पण आता उर्वरित जागांच्या बुकिंगसाठी, प्रवासी आरक्षण सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीच प्रवासी आरक्षण प्रणाली काउंटरकडे जाऊ शकणार आहे.
  • दुसरा आरक्षण तक्ता तयार होण्यापूर्वी ते आसन ऑनलाईन बुक करू शकता येणार आहे. प्रथम बुक करणाऱ्याला प्राधान्य दिले जाणार असून, त्याआधारे जागा वाटप करण्यात येणार आहे.
  • रेल्वे सुटण्यापूर्वी ३० मिनिटे ते ५ मिनिटांपूर्वी दुसरे आरक्षण चार्ट तयार करण्यात येणार आहे. परताव्याच्या तरतुदीनुसार या कालावधीत आरक्षित तिकिटे रद्द करण्याची परवानगी होती. यामुळे ट्रेनमधून प्रवास करणा-या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
  •  

    प्रवाशांची शेवटच्या क्षणी योजना बदलल्यासही ते तिकीट रद्द करू शकतात आणि परतावा मिळवू शकतात, प्रवाशांच्या सोयीसाठी हे बदल केले असल्याचे भारतीय रेल्वेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

    रेल्वे अधिका-याच्या म्हणण्यानुसार प्रवाशांनी रेल्वे सुटण्यापूर्वी एक-दोन तास आधी रेल्वे स्टेशनवर पोहोचणे अपेक्षित आहे. तर आयआरसीटीसी ई-बुकिंगचे नियम कायम असल्याचेही त्यांच्याकडून सांगितले जात आहे. तर रेल्वे तिकिटांच्या ऑनलाइन बुकिंगला अधिक सोयिस्कर करण्यासाठी भारतीय रेल्वे खात्याने अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यामुळे प्रवाशांना अनेक सुविधांचा फायदा होणार आहे.


झारखंडमध्ये आता ‘सीबीआय’ला नो एन्ट्री; असा निर्णय घेणारं आठवं राज्य