घरमुंबईनाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ घाई आणि हात म्हणायचा नाही - नाही, आशीष...

नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ घाई आणि हात म्हणायचा नाही – नाही, आशीष शेलारांचा खोचक सवाल

Subscribe

विकासकांना प्रिमियम देण्याच्या मुद्द्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेसच्या बंडामुळे हा निर्णय लांबला होता. कॉंग्रेसच्या या नाराजीच्या मुद्द्यावर आशीष शेलार यांनी नेमक बोट ठेवत प्रश्न विचारला आहे की, सगळ नीट ठरलय ना ? कॉंग्रेसच मन वळलय ना ? नाहीतर पुन्हा धनुष्यबाणाची घड्याळ घाई आणि हात म्हणायचा नाही – नाही ! अशा शब्दात त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांना एकाच बाणात लक्ष्य केले आहे. सूट देण्याची फाईल आज पुन्हा मंत्रीमंडळात येणार असल्याचे सांगत त्यांनी एक ट्विट केले आहे.

- Advertisement -

 

आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये सवाल करत म्हटले आहे की, आमचा सवाल एवढाच आहे की घर घेणाऱ्या सामान्य मुंबईकरांना फायदा होणार का ? प्रिमिअमच्या सूटीची खैरात बिल्डरला वाटाल आणि घर घेणाऱ्यांची स्टॅम्प ड्युटी विकासक भरेल अशी फसवी अट टाकाल तर खबरदार, असा इशाराही त्यांनी दिला आहे. घराच्या किंमती वाढवून स्टॅम्पड्युटी विकासक भरेल असा हातभट्टीचा व्यवहार करून सामान्य मुंबईकरांना फसवलत तर आम्ही त्याचा जाब विचारत राहू असेही आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमधून स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -