घरमुंबईमुंबई विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावर! सुरक्षा यंत्रणा सुस्त

मुंबई विद्यापीठाची सुरक्षा वाऱ्यावर! सुरक्षा यंत्रणा सुस्त

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील निकालाचा गोंधळ सर्वश्रुत आहे. त्यात आता ढिसाळ सुरक्षा यंत्रणेचीही भर पडली आहे. कलिना कॅम्पसच्या महात्मा फुले भवनमध्ये जाणाऱ्या विझिटर्सची सुरक्षा रक्षक कोणतीही तपासणी करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. ‘आपलं महानगर’च्या प्रतिनिधीने सुरक्षा यंत्रणेतील सुमार दर्जाच्या कामाचा स्वतः अनुभव घेतला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता सुरक्षा यंत्रणा खडबडून जागी झाली. ‘आपलं महानगर’च्या पाठपुराव्यानंतर बॅग तपासणीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

मुंबई विद्यापीठात परीक्षा विभागामध्ये सुरू असणाऱ्या अडचणींचे सत्र संपण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच आता सुरक्षा यंत्रणेतल्या त्रुटी समोर आल्या आहेत. मुंबई विद्यापीठामध्ये साधारणपणे ५०० पेक्षा अधिक विषयांसाठी ३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात. शैक्षणिक प्रमाणपत्रासाठी, तसेच निकालाशी संबंधित अनेक विषयांसाठी विद्यार्थी आणि पालक परीक्षा भवनमध्ये दररोज हजारोच्या संख्येने येतात. आत जाण्यासाठी सुरुवातीला एका भल्या मोठ्या रांगेत उभे राहून नाव नोंदणी कारावी लागतेच. पण आत प्रवेश करताना मात्र कोणत्याही प्रकारची सुरक्षा तपासणी केली जात नाही.

- Advertisement -

ही बाब ‘आपलं महानगर’च्या प्रतिनिधीने मुख्य सुरक्षा अधिकारी नामदेव बुकाने यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या बाबतीत त्वरीत कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार लागलीच पुन्हा तपासणी आणि सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली. याआधी विद्यापीठाने अनेक खासगी एजन्सीची नेमणूक केली होती. पण या एजन्सी वादात आल्याने त्यांना हटवण्यात आले होते. आता विद्यापीठाने महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची या कामासाठी नेमणूक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -