घरताज्या घडामोडीकोरोनाग्रस्तांसाठी राजावाडी, सावरकर आणि अगरवाल रुग्णालयांत विलगीकरण कक्ष

कोरोनाग्रस्तांसाठी राजावाडी, सावरकर आणि अगरवाल रुग्णालयांत विलगीकरण कक्ष

Subscribe

उपनगरातील ३ रुग्णालयात ५ दिवसांमध्ये विलगीकरण कक्षाचे काम पूर्ण करण्यात आले.

मुंबईतील महापालिकेच्या विशेष आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी १ हजार खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले. त्यानंतर सर्व रुग्णालयांमध्ये या विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येत आहेत. कस्तुरबा आणि केईएम तसेच जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमध्ये अशाप्रकारचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले. परंतु याबरोबरच पूर्व उपनगरातील सावरकर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि मुलुंडचे एम.टी.अगरवाल आदी रुग्णालयांमध्ये अवघ्या पाच दिवसांमध्ये १८७ खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहेत.

उपायुक्तांना २५ लाखांपर्यंत खर्च करण्याच्या अधिकार

मुंबईत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याच्यादृष्टीकोनात उपाययोजना राबवण्याकरिता मुंबई महापालिकेने कस्तुरबा रुग्णालयामध्ये कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर केईएम आणि महापालिकेच्या ताब्यात आलेल्या सेव्हन हिल्समध्ये कोरोनाग्रस्त आणि संशयित रुग्णांवर उपचार करण्यासाठी कक्षाची स्थापना केली. परंतु कोरोना विषाणूचा संसर्ग पाहता आणि भविष्यातील धोका ओळखता महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी उपनगरीय आणि विशेष रुग्णालयांमध्ये १ हजार खाटांचे विलगीकरण कक्ष तयार करण्याचे निर्देश दिले होते. हे कक्ष तयार करताना किरकोळ स्वरुपाची डागडुजी आणि इतर कामे संचालकांच्या देखरेखीखाली करून घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यासाठी प्रत्येक परिमंडळाच्या उपायुक्तांना २५ लाखांपर्यंत खर्च करण्याच्या अधिकार देण्यात आले होते. त्यानुसार सिव्हील आणि यांत्रिकी कामांसाठी अभियंते तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांची यादी तयार करून त्यांना पाच दिवसांमध्ये अशाप्रकारचे काम करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सेव्हन हिल्सचे रुग्णालयातील विलगीकरण कक्षाचे काम विश्वासातील कंत्राटदारांची मदत घेत अभियंत्यांनी पार पाडले. महापालिकेच्या या अभियंत्यांप्रमाणेच पूर्व उपनगरातील तीन रुग्णालयांमध्ये महापालिकेच्या अभियंत्यांनी अवघ्या पाच दिवसांमध्ये महापालिकेच्या रुग्णालयातील साधारण वॉर्डाचे रुपांतर विलगीकरण कक्षात केले आहे.

- Advertisement -

डॉक्टरांच्या सुचनेनुसार हे सर्व विलगीकरण कक्ष

परिमंडळ ६ चे उपायुक्त विजय बालमवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंडमधील स्वातंत्र्यवीर रुग्णालय, राजावाडी रुग्णालय आणि मुलुंड एम.टी. अगरवाल रुग्णालय आदी ठिकाणी एकूण १८७ खाटांचे सुसज्ज असे विलगीकरण कक्ष महापालिकेच्या अभियंत्यांनी बनवले आहेत. राजावाडीतील वॉर्ड क्रमांक १२, १३ आणि १४चे रुपांतर विलगीकरण कक्षात करण्यात आले आहे. रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या सुचनेनुसार हे सर्व विलगीकरण कक्ष बनवण्यात आले आहेत.

मुलुंड पूर्व सातंत्र्यवीर सावरकर रुग्णालय : ३० खाटा

- Advertisement -

घाटकोपर राजावाडी रुग्णालय : १०० खाटा

मुलुंड एम.टी. अगरवाल रुग्णालय : ५६ खाटा


हेही वाचा – CoronaVirus: मुंबईत गेल्या २४ तासात ५२ नवे रुग्ण, आकडा ३३०वर!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -